आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

देवतांचे राजा असलेल्या इंद्रदेवांना या कारणांमुळे पुजले जातं नाही.

 

आपल्या सर्वानाच माहिती आहे की, देवराज इंद्र हे हिंदू धर्मातील सर्व देवतांचे राजा होते. त्यामुळेच त्याला इंद्रदेव असेही म्हणत होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की, हिंदू धर्मात सर्व देवी – देवतांची पूजा अर्चना केली जाते, परंतु देवतांचे राजा असलेले इंद्रदेव यांची मात्र पूजा केली जातं नाही? पूर्ण भारतभर देवतांचे राजा इंद्रदेव यांचे एकसुद्धा मंदिर का नाहीये?

इंद्रदेव

new google

हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक अश्या कथा आहेत ज्यामध्ये इंद्रदेवांची पूजा न करण्याचे कारणे आणि त्यांचे एकही मंदिर नसण्या मागचं कारण आहे.

 

यामागे नक्की कोणते कारणे आहेत, का इंद्रदेवाची पूजा केली जात नाही. आजच्या लेखात जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…

 

इंद्रदेवाची पूजा का केली जात नाही हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला हे माहिती असायला हवे की इंद्रदेव कोण होते? हिंदू धर्मग्रंथानुसार इंद्र हे कोण्या एका देवताचे नाव नाही ते स्वर्गलोकाच्या गादीवर जो कोणी देव बसत असे त्याला इंद्र अशी उपाधी दिली जायची. असं म्हटलं जाते की आतापर्यंत एकूण 14 इंद्रांनी स्वर्गाचा कारभार पहिला आहे.

 

असेही म्हटले जायचे की इंद्रपदावर जो कोणी विराजमान व्हायचा त्याला नेहमीच आपले पद हातातून जाण्याची भीती सतावत असे. कारण देव-देवतांमध्ये स्वर्गाचा राजा बनण्यास अनेक जण नेहमी उत्सुक असतं. थोडक्यात नेहमी कोण श्रेष्ठ असेल, ताकतवर असेल तोच इंद्रपदी विराजमान होत असे. त्यामुळेच इंद्रपदी विराजमान असलेला देव कोणत्याही साधू आणि इतर देवांना आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली बनू देत नसे. त्यासाठी अनेक वेळा इंद्राने साधूंच्या तपश्या अप्सरा पाठवून भंग केल्या, अनेक देवतांचे वाढते पराक्रम पाहून त्यांच्याशी सुद्धा कुटील व्यवहार करत असे.

 इंद्रदेव

 

अश्या कारणासोबतच एक पौराणिक कथा जिचे वर्णन पौराणिक ग्रंथामध्ये केले आहे.त्या घटनेपासूनच पृथ्वीलोकांत जो कोणी इंद्र असेल त्याची पूजा करणे बंद केले ते या घटनेमुळे.

कथेनुसार पृथ्वीलोकी गौतम ऋषी नावाचे एक ऋषी होते. ते खूप ज्ञानी आणि योग्य पुरुष होते. ते जंगलामध्ये आपल्या पत्नीसोबत राहत असतं.  त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या होते. अहिल्या अत्यंत सुंदर सोबतच एक पतिव्रता स्त्री होती.
जो कोणी अहिल्याला पाहत असे तो तिच्या सौन्दर्यावर मोहित होत असे.

एके दिवशी अहिल्या आपल्या झोपडीमध्ये आपल्या पतीची सेवा करत होती. त्याचं वेळी इंद्रदेव तेथून जात होते त्यांनी आहिल्याला पहिले आणि ते तिच्या सौन्दर्याच्या प्रेमात पडले. त्यावेळी जरी इंद्र तेथून वापस स्वर्गलोकात दाखल झाले तरी सुद्धा त्यांचे मन मात्र अहिल्यामध्येच अडकून राहिले होते. त्यांना सारखी अहिल्याच डोळ्यासोमर दिसू लागली होती. ते हाच विचार करत होते की, असं काय करायला हवं की ज्याने अहिल्या स्वतःहून संपूर्णपणे इंद्रदेवाची होईल.

तेव्हा त्यांनी यासाठी छळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. गौतम ऋषीवर बारीक लक्ष ठेवल्यावर त्यांच्या लक्षात आले की, ते रोज सकाळी ध्यान करण्यासाठी आपल्या झोपडीपासून बरंच लांब जात असतात. वापस येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागत असे. तेवढ्या वेळ अहिल्या झोपडीमध्ये एकटीच असे.

इंद्रदेव

एके दिवशी गौतमऋषी सकाळी ध्यानासाठी निघून जाताच इंद्रदेव गौतम ऋषींचे रुप घेऊन अहिल्याकडे आले. हे पाहून अगोदर तर आहिल्याला हा प्रश्न पडला की आज एवढ्या लवकर माझे स्वामी कसेकाय आले? परंतु तीने गौतम ऋषींच्या वेषात असलेल्या इंद्राला कोणताही प्रश्न न विचारता त्यांची सेवा करण्यास सुरवात केली.

जेव्हा थोड्या वेळाने खरे गौतम ऋषी वापस आले, तेव्हा त्यांनी आहिल्याला आपल्याच रूपातील एका बहुरुप्यासोबत पाहून खूप राग आला. आणि त्यांना हे समजण्यात वेळ नाही लागला की, आपल्या रूपातील हा बहुरूपी दुसरा तिसरा कोणी नसून इंद्र आहे.

रागामध्ये ऋषीने इंद्राला श्राप दिला की, ज्या स्त्रीच्या यौन सुखासाठी तू छळ केलास तस्याच तुझ्या संपूर्ण शरीरावर योनी उत्पन्न होतील आणि ,पृथ्वी लोकांवर तुला कोणीही पूजा अर्चनेच्या लायक समजणार नाही.

हे ऐकून इंद्र आपल्या खऱ्या रूपात येऊन ऋषींचे पाय पकडून क्षमा याचना करू लागले. तेव्हा त्यांनी इंद्रावर तरस खाऊन त्याच्या शरीरावरती निर्माण झालेल्या योनींना डोक्यांमध्ये परिवर्तित केले.परंतु कोणीही इंद्राची पूजा न करण्याचा श्राप मात्र कायम ठेवला.

या घटनेपासूनच सर्व लोकांनी इंद्राची पुजा करण्यास बंद केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here