आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या मिठाचा शोध सिकंदरच्या या घोड्याने लावला होता..


हिंदू संस्कृतीमध्ये व्रत, उपवासाला खूप महत्व दिल्या जाते. हिंदू संस्कृतीमाद्ये उपवास आणि व्रत करण्याची खास परंपरा आहे, यादिवशी कोणतेही उष्टे अन्न खाल्ल्या जात नाही त्यासोबतच उपवासाच्या दिवशी आपण रोज खातो त्या मिठाचे सेवन  केल्या जात नाही.

उपवासाला शेंबे मिठ rock salt चा उपयोग करतात याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल, परंतु हे मिठ कुठून येते आणि कशापासून बनते? याबद्दल खूप जनांना माहिती नाहीये. आज आपण जाणून घेऊया हे मीठ आपल्यापर्यंत कुठून येते? आणि याचा वापर केंव्हापासून सुरु झाला आहे याबद्दल.

 

मिठ

 

शेंबे मिठाची विशेषतः.

मीठ हे चार प्रकारचे असते, काळे मीठ, साधे मीठ, सेंध मीठ ( शेंबे मीठ) आणि समुद्री मीठ. हिंदू संस्कृतीमध्ये शेंबे मिठाला अतिशय पवित्र मानले जाते. सेंबे मिठालाच इंग्रजीमध्ये rock salt म्हणतात. या मिठाची विशेषतः आहे कि याला कोणत्याही कारखान्यात रिफाइन केले जात नाही.

शेंबे मिठामध्ये पोटॅशियम, मॅग्निशियम, कॅल्सियम हे मिनरल भरपूर प्रमाणात असतात. हेच कारण आहे कि हे मीठ व्रत आणि उपवासाच्या दिवशी शरीरासाठी अतिशय फायदेमंद असते.

मीठ

शेंबे मीठ आपल्यापर्यंत कुठून येते.

शेंबे मिठाला काही ठिकाणी सेंधा मीठही म्हणले जाते कारण, हे सिंध प्रांतातून मागवल्या जाते. पाकिस्तानमधील लाहोर परिसरात हे मीठ मोठ्या प्रमाणात आढळले जाते. आजच्या वेळी पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागातील पंजाब प्रांतामध्ये ‘नमक कोह’ नावाची शेंबे मिठाची सर्वात मोठी खान आहे.

येथील खेवडा मीठ खान हि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खान आहे. येथून दरवर्षी जवळपास ४.६५ लाख मेट्रिक टन मीठ काढल्या जाते. या खाणीमध्ये एव्हढे मीठ उपलब्ध आहे कि, पूर्ण जगात मीठ संपुष्ठात आले तरीही याठीकानीच्या मिठाने जगाला ५०० वर्षापर्यंत मिठाची कमतरता पडणार नाही.

 

मिठ

 

असा लागला शेंबे मिठाच्या खाणीचा शोध.

महान इतिहासकारांच्या माहितीनुसार, या खाणीचा शोध हा सिकंदरच्या काळात लागला होता. सिकंदरने आपले साम्राज्य पसरवण्यासाठी खेवडा परिसरावर हल्ला करून त्यावर अधिराज्य स्थापन केले . युद्धानंतर दमल्यामुळे याठिकाणी विश्रांतीसाठी सिकंदर एका डोंगराच्या पायथ्याशी थांबला होता, त्याच वेळी सिकंदरच्या लक्षात आले कि त्याचा घोडा या डोंगराच्या दगडांना चाटत होता.

याविषयी अधिक शोध घेत असताना त्यांना कळले याठिकाणी मिठाचा कधीही न संपणारा साठा आहे. त्याकाळापासून आजपर्यंत याठीकानावून शेंबे मीठ हे संपूर्ण जगभरात पाठवले जात आहे.

खेवडा खाणीमध्ये ४० किमी लांब भुयार बनवण्यात आले आहे. याठिकाणी खोदकाम करून याचा आकार एखाद्या खोली सारखा झाला आहे. या ठिकाणी खोलीसारखे खोदकाम करण्यामागेही एक खास कारण आहे, मिठाची  खान ढासळून कोणतीही दुर्घटना घडू नये आणि सर्व बाजूने खाणीला आधार राहावा हेच यामागचे कारण आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here