आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात, हा उपाय करून पहा,मिळेल तुरंत आराम..


वातावरणात बदल होताच अनेक जणांना सर्दी खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी बहुतांश लोक अँटीबायोटिक्स गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे , हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

अश्या वेळी आयुर्वेदाचा वापर करून आपलं सर्दीखोकल्याच्या त्रासापासून आराम मिळवू शकतो. आयुर्वेदिक औषधी नेहमीच अश्या छोट्या -मोठ्या आजारांवर गुणकारी ठरत असतात.

 

मध:

वैद्यकीय लोकांनी हे मान्य केले आहे की, मध हा सर्दी खोकल्यावर एक अत्यंत रामबाण उपाय म्हणून समोर आला आहे. हा अन्य मेडिकल टॅब्लेट्स पेक्षा जास्त असरदार असल्याचे आढळून आले आहे.

भारतात प्राचीन काळापासून मधाचा उपयोग :

प्राचीन काळापासूनच मधाचा उपयोग सर्दी आणि खोकल्यावर औषध म्हणून केला जात असे.आयुर्वेदात सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी महत्वाचा उपाय मानले जायचे या गोष्टीवर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा शिकामोर्तब केले आहे. नवीन संशोधनानुसार सध्या मध हा अन्य टॅब्लेट्स पेक्षा सर्दी खोकल्यावर सर्वांत जास्त गुणकारी औषध म्हणून समोर आला आहे.

मध मेडिकल औषोधोपचारापेक्षा असरदार :

सर्दी खोकला

 

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या रिसर्चमध्ये सर्दी खोकल्यावर केल्या गेलेल्या उपायांमध्ये मध हा मेडिकल औषोधपचार पेक्षा जास्त असरदार साबित झाला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये अश्या लोकांवर रिसर्च केली गेले जे नेहमीच सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे परेशान होते, या सर्व ट्रीटमेंट मध्ये सर्वांत असरदार मध राहिला आहे.

इंटीबायोटिक्सच्या तुलनेत जास्त असरदार आहे मध :

रिसर्चमध्ये केल्या गेलेल्या अर्ध्या लोकांना इंटीबायोटिक्स टॅब्लेट्स दिल्या गेल्या, तर अर्ध्या लोकांना मध दिला गेला. या रिसर्चचा परिणाम आचर्यचकीत करणारा निघाला. मेडिकल ट्रीटमेंट घेण्याऱ्या लोकांना ठीक होण्यासाठी वेळ लागत होता तर दुसरीकडे मध दिल्या गेलेल्या लोकांचा बरा होण्याचा कालावधी हा फारच कमी होता.

म्हणजेच मध दिले गेलेले पेशंट सर्वांत लवकर बरे होत होते.

मधाने 44% लवकर कमी होते सर्दी :

रिसर्च नुसार मध सर्दी,खोकला, खसा खवखवने या आजारांवर फायदेमंद उपाय साबित झाला.
मधाचा वापर करणारे पेशंट अन्य मेडिकल ट्रीटमेंट पेक्षा लवकर बरे होत होते. तसेंच मध 44% जास्त लवकर सर्दी खोकला कमी करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here