आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

ज्या नसबंदीच्या जोरावर संजय गांधीने देशात दहशत माजवली होती, तिची कल्पना इथून आली होती.

आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या नावाची भीती सर्व नागरिकांच्या मनात बसली होती. सरकारने दिलेल्या आदेशामुळे देशातील अनेक खेडेगावांना घेराव घालून पुरुषांच्या बळजबरी नसबंदी करण्यात आल्या. आणीबाणीच्या काळातील ज्या कामांमुळे इंदिरा गांधी यांच्यावर टीका झाल्या त्यामध्ये हे काम सर्वात पुढे होते. कॉंग्रेस सरकारच्या या एका निर्णयाने कॉंग्रेस पक्षाच्या अधोगतीची सुरुवात झाली होती.

 

नसबंदी

 

मास स्टरलाइजेशन म्हणजेच मोठ्या संखेने नसबंदी करण्याची जास्त चर्चा हि आणीबाणीच्या काळात झाली होती, परंतु लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळ राज्यात त्याअगोदरच अनेक नसबंदी शिबीर सुरु करण्यात आले होते. सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे याठिकाणी राबवण्यात आलेले हे शिबीर अतिशय यशस्वीपाने पार पडले होते.

ऑगस्ट १९७० रोजी कोचीन येथे जिल्हा विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात एर्नाकुलम जिल्हा अधिक सुदृढ बनविण्यासाठी, तसेच भविष्याच्या तयारीसाठी अजेंडा निश्चित करण्यात आला होता. या चर्चासत्रात लोकसंख्या नियंत्रणाला सर्वाधिक महत्व देण्यात आले होते.

ज्यावेळी हा उपक्रम राबवण्याचा विचार केला जात होता तेंव्हा ३०००० विवाहित जोडपे या उपक्रमांतर्गत येण्यास पात्र ठरली होती. या सर्व जोडप्यांचे स्टरलाइजेशन (नसबंदी) हे येणाऱ्या ५ वर्षात करण्याचे ठरले होते.

नसबंदीचा हा उपक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवशक होते लोकांना याप्रती जागरूक करणे. याचे महत्व पटवून सांगण्यासाठी त्यावेळी एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे नाव होते वैसेक्टमी फेयर
(नसबंदी मेळावा).

 

नसबंदी

यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेसद्वारे निवेदन पाठवले सोबतच नसबंदीबद्दल जागरूकता वाढविणे, आणि शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुरुषांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्याचे कारण, या प्रक्रियेमध्ये वेळ कमी, खर्च कमी आणि रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता देखील नव्हती. म्हणूनच पुरुष नसबंदी हा या शिबिरासाठी उत्तम मार्ग होता.

नसबंदी शिबीर योग्यरीत्या पार पाडण्यासाठी भारतात पहिल्यांदाच ग्रामपंचायती पासून नगर पालीकापर्यंतच्या स्तरावरील सर्व लोक गुंतले होते. ब्लॉक स्तराच्या पातळीपर्यंतच्या लोकांपर्यंत माहिती पोहोचण्याची व्यवस्था केली गेली होती. नसबंदी बद्दल जागरूक करण्यासाठी वारंवार ऑल इंडिया रेडिओने घोषणा करण्यात आल्या होत्या.

कुटुंब नियोजन कामगारांनी अशा सर्व जोडप्यांची यादी बनवली होती, जे नवीन मुल जन्माला आणण्याच्या वयात होती आणि त्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त जिवंत मुलं होती. नसबंदी करण्यासाठी जे कुणी स्वतःहून जात होते त्यांना त्याबदल्यात सरकारकडून पुरुषांना ११४ रुपये तर महिलांना १३५ रुपये मिळत होते.

या शिबिरांची विशेषतः होती, यांना केवळ जागरुकता पसरवण्यासाठी चालवण्यात येत होते. लोकांच्या नजरेसमोर, शहराच्या मध्यभागी, यामुळे लोकांच्या मनात नसबंदी बद्दल असलेले गैरसमज दूर करण्यात मदत मिळाली होती.

 

नसबंदी

 

डिसेंबर १९७० मध्ये एर्नाकुलम याठिकाणी लावण्यात आलेल्या शिबिरामध्ये १५००५ लोकांनी आपली नसबंदी करून घेतली होती. जुलै १९७१ पर्यंत केवळ एर्नाकुलम जिल्ह्यातीलच १९८१८ लोकांनी आपली नसबंदी करून घेतली. बाकी जिल्ह्यांमध्ये
४३६०० लोकांनी या शिबिरामध्ये आपली नसबंदी करून घेतली. या शिबिरामध्ये करण्यात आलेल्या सर्व नसबंदी ह्या लोकांनी त्यांच्या स्वेच्छेने केल्या होत्या.

नसबंदी बद्दल पूर्ण माहिती घेऊन, विचार विमश करून या घटनेच्या चार ते पाच वर्षानंतर संजय गांधीने जे कृत्य केले ते एका अर्थाने सत्तेच्या नशेत गुंग असलेल्या हुकुमशहाचा हुकुमच म्हणावा लागेल. याच हुकुमाने त्याच्या पक्षाला कुठे नेऊन टाकले हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here