आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारताला २००७ चा वर्ल्डकप जिंकवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणारा, श्रीशांत करतोय क्रिकेटमध्ये वापसी!

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. बीसीसीआयतर्फे आयोजित केलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (syed mushtaq ali trophy) साठी श्रीशांतचा केरळ संघात समावेश करण्यात आला आहे.

केरळ क्रिकेट असोसिएशन तर्फे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य २६ खेळाडूंच्या यादीमध्ये श्रीशांतचेही नाव सामील आहे. BCCI च्या निगराणीखाली हि स्पर्धा १० जानेवारी २०२१ पासून खेळली जाणार आहे.

 

new google

श्रीशांत

 

२०१३ मध्ये मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतला बीसीसीआयने ७ वर्षासाठी बंदी घातली होती आणि तिची मुदत यावर्षी संपणार आहे. याबद्दलची अधिक माहिती श्रीशांतने ट्वीट करून सांगितली आहे.

श्रीशांतला अशी पूर्ण खात्री आहे कि, तो घरगुती क्रिकेट खेळून परत एकदा भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करेल. श्रीशांतला २०२३ चा वर्ल्डकप खेळायचा आहे आणि त्यासाठी आपण खूप मेहनत करत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले आहे.

बीसीसीआयने ७ वर्षासाठी बंदी घालण्यापूर्वी श्रीशांत हा भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखल्या जायचा. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे श्रीशांतचे पूर्ण करियर खराब झाले होते. भारताकडून खेळताना श्रीशांतने १६९ विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये ८७ टेस्ट तर ७५ एकदिवसीय विकेटचा समावेश आहे.

यावर्षी खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भारताचे काही दिग्गज खेळाडू युवराज सिंह, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा हे पण खेळताना दिसणार आहेत. युवराज सिंह पंजाब संघातर्फे तर सुरेश रैना उत्तर प्रदेश संघातर्फे खेळताना दिसतील.

श्रीशांत

 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी श्रीशांत सोबत केरळच्या संघामध्ये, रॉबिन उथप्पा आणि संजू समसन यांचीही संभाव्य निवड झाली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here