आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अर्धा एकर शेतीमध्ये 4-5 लाखांचे उत्पन्न काढतोय हा आधुनिक शेतकरी.!

 

परंपरागत शेती करून शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही, शेती कमी असुद्या परंतु ती ‘शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते ‘ याला ध्यानात घेऊन करणे महत्वाचे आहे. आजच्या वेळी असंख्य सुशिक्षित तरुण शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेतीला एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत.

 

new google

आज आम्ही अशाच एका शेतकऱ्या बद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे जमीन केवळ अर्धा एकरच आहे परंतु त्यांचे उत्पन्न मात्र वर्षाकाठेला ३ ते ४ लाख रुपये आहे.

 

शेती

 

हरियाणामधील अमरहेडी गावातील ५८ वर्षीय शेतकरी हवासिंह हे मागील ३० वर्षांपासून भाजीपाल्याची शेती करत आहेत. केवळ सातवी पास असलेल्या हवासिंह यांच्याकडे केवळ अर्धा एकर वडिलोपार्जित जमीन आहे आणि याच जमिनीत ते वर्षाला ३ ते ४ लाख रुपये कमावत आहेत.

 

आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी हवासिंह हे आडत किंवा व्यापाऱ्यांवर निर्भर नाहीत, ते स्वतः दररोज सकाळी ५ वाजता बाजारात जातात आणि त्याठिकाणी बसून आपला शेतीमाल विकतात. बाजारात कोणत्या भाजीला मागणी जास्त आहे यानुसार ते आपल्या शेतात बदल करत राहतात.

 

काही दिवसांपर्यंत केवळ कोतिंबीर, मेथी, गाजर, मुळा यांसारख्या भाज्यांचे उत्पन्न घेत असताना आता त्यांनी स्ट्राबेरी, लसून, फुल गोबी यांसारख्या भाज्यांचे उत्पन्नही सुरु केले आहे.

 

एकाच वेळी अनेक प्रकारच्या भाज्या लावल्यामुळे त्यांना जास्त फायदा होतो, कारण एखाद्या मालाचा भाव कमी झाला तरीही दुसरा माल चांगल्या भावाने विकला जातो. यावेळी हवा सिंह यांच्या शेतात लसून लावलेला आहे.

 

बाकी लोक लसून पूर्ण वाढेपर्यंत आणि परिपक्व होईपर्यंत (एप्रिल) त्याला सांभाळतात परंतु हवासिंह यांनी केवळ दोन महिन्याचा हिरवा लसून बाजारात १०० रुपये किलो याप्रमाणे विकला आहे. बाकी शेतकरी तोच लसून पूर्ण वाढल्यानंतर ३० रुपये प्रती किलो प्रमाणे विकतात.

 

शेती

 

हवा सिंह यांच्या शेतातील स्ट्राबेरी या आठवड्यामध्ये तयार होणार आहे. सध्या बाजारात त्यांचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो याप्रमाणे चालू आहे. स्ट्राबेरी सोबत त्यांनी आता मशरूमची शेतीही सुरु केली आहे. मशरूम हिवाळ्यात ३०० रुपये किलो प्रमाणे विकल्या जातात. हवासिंह यांचा हा व्यवसाय बघून बाकी जिल्यातील जमीनदार शेतकरी त्यांच्याकडे ट्रेनिंग साठी येत आहेत.

 

भाजीपाल्याची शेती करण्यापूर्वी हवासिंह हे मक्तेदारीने जमीन घेऊन त्यामध्ये गहू, धान, यांसारखे परंपरागत पिके घेत. परंतु यामध्ये त्यांना फार काही कमाई होत नव्हती, परिवाराचे पालन पोषण करणे अवघड जात असल्यामुळे त्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता त्यांना फायदा होऊ लागला.

 

भाजीपाल्याच्या शेतीमुळे त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला चांगले शिक्षण दिले आहे. मुलीचे लग्न केले आहे आणि त्यांचा मुलगा आता नोकरीची तयारी करत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here