आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

२०१६ मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमार यांनी एक मोलाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील सर्वात मोठा प्रश्न सोडवत त्यांनी बिहारमध्ये दारूबंदी लागू केली.

 

बिहारमध्ये दारू बंदी असताना एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे आणि याची कल्पना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लागल्यास त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसेल, या खुलास्यानुसार बिहारमधील लोकं हि दारूबंदी असतानाही महाराष्ट्रातील लोकांपेक्षा जास्त दारू पीत आहेत. हि गोष्ठ २०१९-२०२० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणादरम्यान उघडकीस आली आहे.

new google

 

बिहार
Alcohol ban in Bihar

 

 

आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अशी माहिती मिळाली आहे, बिहारमध्ये १५.५ टक्के पुरुष हे मद्यपान करतात. यामध्ये १५ वर्ष वय असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे. बिहार राज्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्या जाते. बिहारच्या शहरी भागात १४ टक्के लोक दारू पीत आहेत तर ग्रामीण भागात यांची संख्या १५.८ टक्के एव्हढी आहे.

 

आज बिहार आणि दारू याबद्दल  सर्वत्र चर्चा होत आहे कारण, या राज्यात एप्रिल २०१६ पासून पूर्णतः दारूबंदी लावलेली आहे.

 

बिहारमध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी किती असरदार?

या सर्वेक्षणामध्ये आणखी काही गोष्टी उघडकीस आल्या आहेत जसे कि, ज्या राज्यांमध्ये पुरुष जास्त दारू पितात त्यामध्ये बिहार नंतर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये १३.९ टक्के पुरुष हे दारू पितात. (यामध्ये सर्व पुरुष हे १५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.)

 

महिलांच्या दारू पिण्याच्या संखेमध्ये बिहार आणि महाराष्ट्र हे जवळपास एकाच पायदानावर आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील दारूचे सेवन लक्षात घेता, महिलांनी बिहारमधील शहरी भागांपेक्षा दारूचे सेवन महाराष्ट्रातील शहरी भागात कमी केले आहे. बिहारच्या शहरी भागात ०.५ टक्के महिला दारू पितात तर महाराष्ट्रात ही संख्या ०.३ टक्के आहे.

 

बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांनी दारू पिण्याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ०.५ टक्के महिला दारूचे सेवन करतात तर बिहारमध्ये ही संख्या ०.४ टक्के आहे.

 

बिहार
Bihar become dry state

 

विशेष म्हणजे देशात सिक्किममध्ये सर्वाधिक महिला ह्या मध्यपान करतात. सिक्कीममध्ये १६.२ तर आसाममध्ये ७.२ टक्के महिला ह्या दारूच्या आहारी गेल्या आहेत.

 

संपूर्ण भारतातील लोकसंखेनुसार दारूचे सेवन बघितले तर तेलंगाना राज्य प्रथम क्रमांकावर आहे याठिकाणी एकूण लोकसंखेपैकी ४३.३ टक्के लोकं हे मध्यपान करतात.

 

सर्वात आश्चर्याची गोष्ठ म्हणजे मोठ मोठ्या पार्ट्यांसाठी प्रसिध्द असलेल्या गोवा राज्यात केवळ ३६.९ टक्के लोकचं मध्यपान करतात. भारतात सर्वात कमी मध्यपान करणाऱ्यांची संख्या हि गुजरात आणि जम्मू काश्मीर मध्ये आहे याठिकाणी अनुक्रमे ८.८ टक्के लोक मद्यपान करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here