आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

पीसी किंवा गेमिंग लॅपटॉपपेक्षा स्मार्टफोनमध्ये रॅम (RAM) जास्त असण्याचे कारण काय आहे? वाचा सविस्तर…

 

२०२० मध्ये बाजारात येत असलेले स्मार्टफोन हे, आपण वापरत असलेल्या साधारण पीसी किंवा गेमिंग लॅपटॉपपेक्षा अधिक (RAM) रॅमसह येत आहेत. काही खास कंपन्यांचे खास फोन तर १२ GB रॅमसह बाजारात उपलब्ध आहेत.

उदा. ( OnePlus 8Pro, Samsung Galaxy Note 20 Ultra, and ASUS ROG Phone 3)

new google

याउलट गेमिंग साठी वापरण्यात येणारा लॅपटॉप AUS TUF Gaming F15 हा 8 GB रॅमसह उपलब्ध आहे. सॉफ्टवेअर, अ‍ॅप ऑप्टिमायझेशन, मेमरीचा प्रकार इत्यादींसह अनेक कारणे आहेत ज्यामुळे आताचे स्मार्टफोन हे अधिक (RAM) रॅमसह येत आहेत. चला तर जाणून घेऊ स्मार्टफोनला पीसीपेक्षा अधिक रॅमची आवश्यकता नेमकी कशासाठी असते याबद्दल सविस्तर.

 

(RAM) रॅमचे प्रकार

 

रॅम

 

सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे पिसी आणि स्मार्टफोन मध्ये वापरण्यात येणारे (RAM) रॅम हे वेगवेगळे असतात. आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन मध्ये लो पॉवर डबल डेटा रेट LPDDR RAM रॅम वापरल्या जातात. लो पॉवर डबल डेटा रेट या नावाप्रमाणेच या प्रकारचे रॅम हे कमी उर्जेवर ऑपरेट करण्यासाठी बनवले आहेत. अधिकतर स्मार्टफोनमध्ये LPDDR4 किंवा LPDDR5 हे रॅम वापरण्यात येतात.

LPDDR रॅम हा प्रत्येकवेळी अपडेट होत त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून मार्केट मध्ये आणल्या जातो. याचे उदाहरण घ्यायचे झाले तर LPDDR5 हा रॅम LPDDR4 पेक्षा कमी उर्जा वापरत चांगली कामगिरी करेल. म्हणूनच काही खास प्रकारच्या अल्ट्राबुक, टॅब्लेट यासारख्या मोबाइल डिव्हाइसमध्ये वापरले जातात. याचे उत्तम उदाहरण आहेत आजकालचे नवीन स्मार्टफोन.

डेस्कटॉप पीसी किंवा गेमिंग लॅपटॉपमध्ये डबल डेटा रेट DDR रॅम वापरल्या जातो. २०१४ पासून DDR4 हा रॅम प्रामुख्याने सर्वच डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपमध्ये वापरण्यात येत आहे. याच रॅमची अपडेटेड आवृत्ती DDR5 हि येणाऱ्या २०२१ मध्ये बाजारात येऊ शकते. या रॅमची प्रत्येक नवीन पुनरावृत्ती ही कमी उर्जा वापरते आणि जुन्या रॅमपेक्षा जास्त कामगिरी देते.

या दोन्ही प्रकारच्या ची कार्यप्रणाली हि एकसारखीच आहे, जेव्हा आपण आपल्या पीसीवर किंवा स्मार्टफोनवर एखादे अ‍ॅप उघडतो तेंव्हा रॅम हा आपल्याला तो प्रोग्राम तात्पुरते संचयित करण्यास आणि बकग्राउंड मध्ये सुरु असलेल्या प्रोग्राममध्ये स्विच करण्याची परवानगी देते.

 

आधुनिक स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणारा रॅम.

 

रॅम

 

आधुनिक काळातल्या स्मार्टफोनमध्ये अधिक रॅम असण्याचे २ प्रमुख करणे म्हणजे, नवीन अॅप्स आणि मोबाइल गेम्स सहजतेने चालण्यासाठी अधिक अधिक रॅम आवश्यक आहे. उदा Asphalt 9 हे LPDDR4 रॅमची सुमारे  १ GB जागा वापरतो.

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या (cross-platform open-world RPG Gensin Impact) ला सहजतेने चालण्यासाठी सुमारे १ GB रॅमची आवश्यकता भासते. दुसरे कारण म्हणजे सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन. आजकाल बरेच मोबाइल फोन Android ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.

आता बाजारात येत असलेल्या स्मार्टफोनमधील रॅमचा काही भाग तर त्या मोबाइल मध्ये इनबिल्ट असलेले अॅप्सच वापरतात. आता बाजारात येत असलेल्या स्मार्टफोनला अधिक रॅमची आवश्यकता आहे कारण ते अधिक सामर्थ्यवान बनले आहेत आणि graphically intensive applications चालविण्यास सक्षम आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here