आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारतात सापांच्या जवळपास 270 प्रजाती आढळतात. त्यापैकी 10% सापाच्या प्रजाती ह्या अत्यंत विषारी साप म्हणून ओळखल्या जातात. त्यातील काहीच प्रजातींचे साप हे विषारी असतात, तर बऱ्यापैकी साप हे बिनविषारी आहेत.

भारतामध्ये ह्या 10% अधिक विषारी सापांच्या प्रजाती जंगली भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. असं असलं तरी नेमके कोणता साप हा किती विषारी आहे आणि कोणता बिनविषारी,कमीप्रमाणत विषारी आहे हे निश्चित प्रमाणात सांगता येणे अशक्य आहे.

विषारी

new google

 

यामुळेच आज आम्ही तुम्हाला सापाशी निगडित काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही साप विषारी आहे का कमी विषारी हे सहजरित्या ओळखाल.

खाली सांगितलेल्या गोष्टींवरून तुम्ही सहजरीत्या विषारी सापाची ओळख करू शकता.

विषारी साप हे जास्तीत जास्त चमकदार असतात. त्यामुळे जेव्हाही साप दिसेल तर त्याच्या
रंगावरती आवश्य लक्ष द्या.

कोब्रा: कोब्रा साप जास्तीत जास्त विषारी सापापैकी एक आहे. कोब्रामध्ये असलेली विषाची मात्रा ही सामान्य सापाच्या तुलनेत जास्त असते.

समुद्री साप:
समुद्रामध्ये असलेले जवळपास सर्वच साप हे विषारी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावधानी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

जर तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर तुम्हाला कळेल कि, विषारी सापांचे तोंड हे विशिष्ट अश्या त्रिकोणीय अवस्थेत असते.ज्याला आपण सापाचा फना म्हणतोत. यासारख्या मोठा फना असलेल्या सापामध्ये असलेले विष हे खूप जहरीले असते.

या विषाची थोडीशी मात्राही माणसांचा जीव घेण्यास पुरेशी असते. त्यामुळे असे मोठ्या फण्याचे साप दिसताच सावधानता बाळगायला हवी. विषारी सापांमध्ये प्रामुख्याने कोब्रा, कोलाब्रिडी, वायपर यांसारखे व अन्य समुद्री सापांचा समावेश होतो.

बिनविषारी साप कसे ओळखाल?

विषारी

 

बिनविषारी किंवा कमी प्रमाणात विषाची क्षमता असणाऱ्या सापांचे शरीर हे चमकदार नसते.

मानवी वस्तीमध्ये आढळणारे 70/80% साप हे बिनविषारी असतात. असं सर्पमित्रांनी केलेल्या अभ्यासावरून लक्षात आले आहे. बिन विषारी सापाचे तोंड हे लांब असते,आणि त्यांना फना काढता येत नाही.

असे साप अजगर सारख्या प्रजातीमध्ये मोडतात. ह्या प्रजातीतील बऱ्यापैकी साप बिनविषारी जरी असले तरीसुद्धा त्यांना स्वरक्षणासाठी एक विशिष्ट ओळख दिली जाते.

सर्पमित्रांच्या निदर्शनानुसार जे साप विषारी असतात त्यांचे दात हे तीक्ष्ण असतात. परंतु याचा अर्थ असा असा नाही की तीक्ष्ण दात असलेले सर्वच साप विषारी असतात. किंवा ज्या सापचे दात तीक्ष्ण नाहीत ते सर्वच साप बिनविषारी आहेत.

भारतात बिनविषारी सापांमध्ये अजगर, बेंडेड कुकरी, धामण, वाळूतील अजगर असे काही महत्वाचे साप आढळतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here