आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अंडी शाकाहारी कि मांसाहारी?

आपल्या शरीरासाठी प्रोटीन्स किती महत्वाची आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. अगदी स्नायू बनवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत प्रोटीन्सचे सेवन केले जाते. प्रोटीन्सचे नाव येताच आपल्या डोक्यात विचार येतो तो म्हणजे प्रोटीन्सचा सर्वात मोठा स्त्रोत अंडी.

अंडी खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले कैल्शियम, विटॅमिन बी12 आणि आयरन हे पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात. मांसाहारी लोक अंडी सहजतेने खाऊ शकतात परंतु शाकाहारी व्यक्तींना अंडी खाणे जमत नाही. आणि यामुळेच त्यांच्या शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाहीत.

शाकाहारी

new google

 

अंडी हे शाकाहारी आहेत कि मांसाहारी याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा होत आली आहे. अनेक लोकांना आजही असा संभ्रम आहे कि, अंडी हि शाकाहारी आहेत कि मांसाहारी? चला तर मग आज हा भ्रम दूर करूया.

शरीरामध्ये प्रोटीन्सची आवश्यकता अतिशय महत्वाची आहे, शरीरात प्रोटीन्सच्या कमीमुळे (protein deficiency) शरीरातील उर्जा कमी होत जाते, केस गळू लागतात, हात पायाची नखे कमकुवत होतात.

तुम्ही जर मसल्स बनवत असाल किंवा वजन कमी करत असाल तर प्रोटीन्स युक्त आहार घ्यावा लागतो. हे सर्व प्रोटीन्स तुम्हाला एकट्या अंड्यामधून मिळू शकते. अंडी हि एक सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात, ज्यामध्ये अनेक प्रकारचे न्युट्रीशियन आढळतात. एका उकडलेल्या अंड्यामध्ये (साधारणतः ४४ ग्राम) ५.५ ग्राम प्रोटीन, ४.२ ग्राम, फॅट, २४.६ मिली ग्राम कॅल्शियम, ८.८ मिली ग्राम आयरन, तसेच ५.३ मिली ग्राम मैग्नीशियम हे असतात.

शाकाहारी लोकं अंडी खात नाहीत कारण त्यांचा असा समाज असतो कि, अंडी हि मांसाहारी असतात. जे लोक समजतात कि, कोंबडीचे पिल्लू हे अंड्यातूनच बाहेर येते त्यांनी प्रथम अंडी देण्याच्या प्रक्रियेला समजून घेतले पाहिजे.

 

शाकाहारी

 

कोंबडी जेंव्हा ६ महिन्याची होते तेंव्हा टी दर २४ ते २६ तासाच्या आत १ अंडे देत राहते, परंतु अंडी देण्यासाठी हे जरुरी नाही कि टी कोंबड्याच्या संपर्कात आलीच असेल. जेंव्हा कोंबडी कोंबड्याच्या संपर्कात ण येता अंडी घालते त्या अंड्यांना अनफर्टिलाइज्ड अंडी म्हणाल्या जाते.

वैज्ञानिकांनी याची पुष्टी केली आहे की या अनफर्टिलाइज्ड अंड्यांमधून कधीही कोंबडीचे पिल्ले बाहेर निघू सहज=कात नाहीत, म्हणून जर आपण अंडी हे मांसाहारी आहेत असे समजत असाल तर तुम्ही पूर्णतः चुकीचे आहात.

जेंव्हा कोंबडी एखाद्या कोंबड्याच्या संपर्कात येऊन अंडी घालते त्या अंड्यांना तुम्ही मांसाहारी अंडी म्हणू शकता याचे कारण, या अंड्यांमध्ये गमेटेस पेशी असतात, ज्यामुळे ते मांसाहारी असतात.

आता सर्वात मीठ प्रश्न हा आहे कि, आपणास कसे कळणार कोणते अंडी शाकाहारी आहेत आणि कोणते मांसाहारी. आपल्या सर्वांना माहीतच असेल कि अंड्याच्या पांढऱ्या भागात केवळ प्रोटीन असते. यामुळे पांढऱ्या अंड्यांना (egg white) शुध्द शाकाहारी म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

बाजारात येत असलेली साधारणतः सर्वच अंडी हि अनफर्टिलाइज्ड असतात म्हणून यांना शाकाहारी व्यक्तीही खाऊ शकतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here