आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करताना म्हणाले, येणाऱ्या सहा महिन्यांपर्यंत राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य राहणार आहे.

आज सोशल मिडियाच्या माध्यमातून बोलताना, या परिस्थितीचा आढावा घेणारे विशेषतज्ञ हे परत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत आहेत, परंतु लॉकडाऊन मध्ये लोकांवर काय परिणाम झाले आहेत याचे भान बाळगून मी त्याचा विचार थांबवला आहे.

उद्धव ठाकरे

काही देशांमध्ये परत एकदा कोरोनाचा प्रसार वाढत आहे आणि त्या देशात लॉकडाऊन परत कठोर करावा लागत आहे, कारण या परिस्थितीवर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे सर्वांनी नवीन वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सावधानता बाळगावी असेही ते म्हणाले.

new google

याविषयी अधिक बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रसारावर आजपर्यंत पूर्णतः नियंत्रण मिळाले नाही, परंतु परिस्थिती सुधारलेली आहे. उपचारपेक्षा अधिक फायदेशीर आहे आपण सार्वजनिक ठिकाणी मास्काचा वापर करावा.

सरकारने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचा पालन ण करणाऱ्या लोकांनी हे समजून घ्यायला हवे कि, ते केवळ सुरक्षा नियमांचाच नाही तर कायद्यांचे पण उलंघन करत आहेत.

उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर पलटवार  

केंद्रात असलेल्या भाजप सरकारने “महाराष्ट्रातील सरकार हे अहंकारी आहे” अशी टिका केली होती, यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, ” होय हे सरकार अहंकारी आहे परंतु हा अहंकार राज्यातील जनतेसाठी कल्याणकारी आहे” राज्यात अनेक पक्षांचे सरकारे येतील आणि जातील परंतु या निर्णयामुळे पुथिल अनेक पिढ्यांना फायदा होणार आहे.

 

उद्धव ठाकरे

 

पुठे बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र राज्य हे कोरोना संकमितांची संख्या आणि यामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा जाहीर करण्यात सर्वात पारदर्शी सरकार आहे.

शनिवारी राज्यात ३९४० लोकांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली यासोबतच राज्यात आजपर्यंत झालेल्या संक्रमितांची संख्या हि १८९२७०७ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ७४ नवीन संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत मरणाऱ्यांची संख्या हि ४८६४८ झाली आहे.

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here