आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

अकबर बादशहाची पूजा करणाऱ्या या गावाचे स्वतंत्र असे कायदे आहेत..


फिरण्यासाठी आजपर्यत आपण अनेक ठिकाणी गेले असाल. परंतु जास्तीत जास्त फिरण्यासाठी, ट्रेकिंगला म्हटल कि सर्वांत पहिली पसंद असते ते म्हणजे हिमाचल प्रदेश! ट्रेकिंग साठी जाणारे असोत कि फिरन्यास प्रत्येकाला हिमाचल प्रदेश आपलासा वाटू लागतो. हिमाचल हा ट्रेक आणि फिरस्तींसाठी जरी प्रसिद्ध असला तरी याच हिमाचल प्रदेशमध्ये अनेक माहितीपूर्ण व रहस्यमय घटनांचा इतिहास दडलेला आहे.

“मलाना” अकबर बादशहाची पूजा केली जाणारे एकमेव गाव.. जाणून घ्या कारण..

असच एक गांव ह्या हिमाचल प्रदेशमध्ये दडलेले आहे ज्या गावात अकबराची पूजा केली जाते. एवढच नाही तर यामुळे हे गांव एवढे प्रसिद्ध झाले आहे कि, इकडे येण्यासाठी परदेशी पर्यटक सुद्धा उत्सुक असतात.

 

new google

मलाना

हिमाचल प्रदेशातील “मलाना” या गावामध्ये मुघल बादशाह अकबर याची अत्यंत भक्तीभावाने पूजा केली जाते. स्वतःला अलेक्स्झाडर वंशाचे समजणारे या गावातील लोक सिकंदराच्या सैनिकांचे वंशज आहेत.

मलाना गावातील लोक जमलु नावाच्या देवीची पूजा करतात. ह्या मंदिराच्या बाहेर अनेक लाकडी भिंती आहेत ज्यावर वेगवेगळे कोरीव नक्षीकाम केले गेले आहे. यामध्ये त्यांच्या वंशाचे युद्ध करत असलेले सैनिक, त्याकाळील त्यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या नागरिकाचे चित्र तसेच त्यांचे सैनिक वंशज वापरत असलेल्या हत्यारांचे चित्र रेखाटले गेले आहे.

मलाना गावातील लोक हे भारतीय संविधान मानत नाहीत. त्यांनी त्यांच्या गावापुरते स्वतःचे असे कायदे निर्माण केले आहेत. ज्यामुळे हे गाव इतर गावांपेक्षा चर्चेत राहिले जाते.गावच्या बाबतीत कुठलाही निर्णय हे फक्त गावच्या कायद्याच्या दृष्टीनेच घेतला जातो.

येथील लोक हिंदू – देवी देवतांची सुद्धा पूजा करतात. परंतु अकबराची पूजा हि नियमित व गुप्तरीत्या केल्या जाते.

मुघल बादशाह अकबर यांची पूजा करणारे भारतातील एकमेव गाव अशी ओळख असलेले हे मलाना गाव. नेमके हे अकबर बादशाहची पूजा का करतात यामागे काय आहे? याबद्दल माहिती विचारताच ते यामागे असलेली एक कथा सांगतात.

मलाना

ती कथा अशी..

एकदा मुघल बादशाह अकबर याला स्वतःच्या शक्तीवर गर्व निर्माण झाला होता.अकबर बादशहाचे गर्वहरण करण्यासाठी जमलु देवाने पूर्ण दिल्ली शहर बर्फाने गोठवून टाकले होते. त्यांनतर अकबरला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यानेस्वतः मलाना गावात येऊन जमलु देवाची माफी मागितली होती.

ह्या गावाबद्दल आनखी विशेष अशी माहिती म्हणजे या गावातील दुकानांमध्ये बाहेर गावच्या लोकांना जाता येत नाही.
बाहेरगावावरून आलेल्या पर्यटकांना तशेच आणखी कोणत्याही व्यक्तींना हे लोक आपल्या दुकानामध्ये पाय ठेवू देत नाहीत. एवढेच नाही तर बाहेरच्या लोकांना  यांच्या दुकानातील वस्तूंना हात सुद्धा लावण्याची परवानगी नाहीये.

येथे जर पर्यटकांना काही खरेदी करायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे, दुकानाच्या बाहेरून त्यांना आपल्याला जी वस्तू पाहिजे टी मागणे, आणि पैसे सुद्धा दुकानाच्या बाहेरच देणे . ते स्वतः तुम्ही मागाल  ती वस्तू घेऊन दुकानाच्या बाहेर येतात आणि तुम्हाला देतात. या अनोख्या नियमामुळे पर्यटक एकवेळ येथे भेट देण्यासाठी उत्सुक असतात.

मलाना

गावातील प्रतिष्टीत लोक त्यांच्या परंपरेविषयी अतिशय जागरूक असतात. कोणीही कोणत्याही प्रकारचा नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वेळीच बजावण्याचे चोख काम हि गावची प्रतिष्टीत मंडळी करते. बाहेर गावावरून फिरण्यास आलेल्या लोकांवर यांचे विशेष असे लक्ष असते.

तुमच्याकडून छोट्यात छोटी चूक जरी झाली. अथवा तुम्ही त्यांच्या नियमांच्या विरोधात काही केले तर तुम्हाला १०० ते १००० रुपये दंड सुद्धा ठोटावला जाऊ शकतो. या गावातील अश्याच अनेक गोष्टींमुळे हे गांव प्रसिद्ध झाले आहे. वर्षभर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच जात आहे.

अतिथींना देवासमान मानणारी आपली हिंदू संस्कृती. परंतु या गावातील लोक हे आपल्या नियम आणि संस्कृतीमुळे मुक्कामी असलेल्या पर्यटकांना वेशीच्या  बाहेर तंबू ठोकून राहण्याची सोय केली जाते.

 

या आणि अश्या आणखी वेगवेगळ्या गोष्टीमुळे मलाना हे गांव पर्यटनासाठी भारतासह विदेशातील लोकांचे सुद्धा आवडते ठिकाण बनत चालले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here