आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

काकडी खाण्याचे हे 8 आरोग्यदायी फायदे वाचून चकित व्हाल,दररोजच्या जेवनात करावा काकडीचा सहभाग..!


आयुर्वेदिक दृष्ट्या काकडी ही शितल, पित्तशामक, थंड, पाचक व मूत्रगामी आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे काकडी खाल्ल्याने शरीरातील मूत्र प्रमाण वाढते व यामुळे मुत्रविकार नाहीसे होतात. काकडी ही बाराही महिने खाण्यास उपयुक्त आहे. काकडीमध्ये विपुल प्रमाणात खनिजे आहेत.

अनेकजण काकडीवरील साल काढून खातात तसं न करता जर काकडी सोबतच साल खाल्ली तरी त्याचे जास्त फायदे आहेत, कारण त्यामध्ये जीवनसत्व व क्षार असतात. त्याचबरोबर काकडीमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व ,पोटॅशियम, मॅग्नेशियम, सिलिकॉन व तंतुमय पदार्थ ही पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात मिळतात. काकडी ही कच्ची खावी कारण पचनास हलकी असते .

काकडी

काकडी चे गुणधर्म

काकडी ही शितल, पित्तशामक, थंड, पाचक व मूत्रगामी आहे.

शरीरातील चक्कर व आग कमी करते .

काकडीचे फायदे संधिवात,मधुमेह , मूत्र विकार यावर उपयोगी आहे .

काकडी खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात .कारण काकडी मुळे उष्णता कमी होण्यास मदत होते .

वेगवेगळ्या आजारावरील वेगवेगळा काकडी चा उपयोग आहे. काकडीचे सेवन हे ज्या त्या आजारासाठी वेगवेगळे आहे .

काकडी चे  उपयोग

काकडी

१) काकडीचा रस बियांसहित गुणकारी असतो. अनुशापोटी घेतल्यास ह्याचा जास्त फायदा होतो. स्थूलतेवर व उष्णता कमी करण्यास जास्त फायदा होतो.

२) काकडी चा उपयोग दररोज जेवण करताना केला तर पित्तशामक, पचन, मळमळ, उलटी हे बंद होण्यास मदत होते .

३) भूक लागत नसेल किंवा काही खायची इच्छा होत नसेल तेव्हा काकडीचे काप करून त्यामध्ये पुदिना, काळे मीठ घालून सेवन करावे त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते .

४) चेहऱ्याचा टवटवीतपणा व सौंदर्य वाढविण्यास काकडीचा फार मोठा फायदा होतो. काकडीचा रस व मध यांचे मिश्रण करून जर चेहऱ्याला लावले तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.

५) झोप लागत नसेल तर काकडीचे काप करून डोक्यावर ठेवावे थोड्याच वेळात झोप लागते .

६) डोळ्याभोवती काळे सर्कल घालवण्यासाठी काकडीचा रस व बटाट्याचा रस मिक्स करून लावल्याने सर्कल कमी होण्यास मदत होते.

७) चेहऱ्यावरील वांग काळपटपणा घालवण्यासाठी काकडीचा रस, दुध व हळद यांचे मिश्रण करून चेहऱ्याला लावावे यामुळे चेहऱ्यावरील वांग व काळपटपणा निघून जातो.

८) भाजलेल्या ठिकाणी काकडीचा रस लावल्याने थंड होण्यास मदत होते व जखम कमी करण्यासाठी उपयोग होतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here