आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे पूर्वी दिल्लीचे खासदार गौतम गंभीर ‘जन रसोई’ सुरु करणार आहे. या जन रसोई मध्ये गौतम गंभीर खासदार असलेल्या पूर्व दिल्ली क्षेत्रातील गरीब आणि गरजू व्यक्तींना अवघ्या १ रुपयात दुपारचे पोटभर जेवण मिळणार आहे.

भारतीय क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे विद्यमान खासदार: गौतम गंभीर

गौतम गंभीरने त्याच्या कार्यालयात याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले कि, बुधवारी गांधी नगरात पहिल्या जन रासोईचे उद्घाटन होणार आहे. काही दिवसानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अशोक नगर मध्येही असेच जन रसोई सुरु करण्यात येणार आहे.

गौतम गंभीर खासदार असलेल्या पूर्व दिल्लीतील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एकतरी जन रसोई भिजनालय असावे याची योजना गौतमने बनवली आहे. या भोजनालयामध्ये कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी दामात पोटभर जेवण मिळेल याची पुरेपूर व्यवस्था करण्यात येणार आहे.

देशातील सरावात मोठी ठोक कपड्यांची बाजारपेठ असलेल्या गांधी नगर याठिकाणी बनवण्यात येणारी जन रसोई हि पूर्णतः आधुनिक असणार आहे, यामध्ये आणेल गरजूंना केवळ १ रुपयात आपल्या पोटाची भूक भागवता येणार आहे, अशी माहिती गौतम गंभीर यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे.

भारतीय क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे विद्यमान खासदार: गौतम गंभीर

अधिक माहितीनुसार, जन रसोइमध्ये एका वेळी १०० लोकांची एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे परंतु, कोविड 19 ची गंभीरता लक्षात घेऊन केवळ ५० लोकांना एकत्र बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये भात, डाळ, आणि बाजी हे देण्यात येणार आहे.

गरीब आणि गरजू लोकांसाठी बनवण्यात आलेल्या या जन रासोईचा खर्च हा गौतम गंभीर फौंडेशन आणि खासदार निधीतून होणार आहे. यामध्ये कोणत्याही शासकीय निधीचा वापर करण्यात येणार नसल्याचे गौतम गंभीरच्या
कार्यालयाने स्पष्ठ केले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here