आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे,जाणून आच्छर्यचकित व्हाल..

कारल्याचे नाव ऐकले की अनेकजण नाक मुरडत असतात.कारले हे चवीला कडू असल्याने अनेकजण ते खात नाहीत.पण जे कारले जिभेला कडू लागते त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.कारल्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. कारल्याचे वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत म्हणजेच कारले हे निसर्गाने आपल्याला दिलेले एक वरदानच आहे.

कारले

कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह , फॉस्फरस त्याचबरोबर ” जीवनसत्व अ” आणि ” जीवनसत्त्व क ” हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात . कारल्यामध्ये “जीवनसत्व ब ” चे प्रमाण हे थोड्याशा प्रमाणात आढळून येते. या सर्व जीवनसत्वामुळे कारले शक्तीवर्धक आहे त्याच बरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे त्याला जेवणाबरोबर औषधे म्हणून खुप प्रमाणात वापर केले जाते.

new google

◆ उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कारल्याच्या वेलाची पाने रोज खायला हवीत. कारल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहायला मदत होते कारण यामध्ये असलेल्या ” पोटॅशियम ” आणि ” कॅल्शिअम ” मुळे उच्च रक्तदाबाची पातळी कमी होऊन रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

◆ रक्तामध्ये असलेल्या विषारी द्रव्यांमुळे विषाणू आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरवत असतात. डोके दुखणे , थकवा येणे ,उभे राहू न वाटणे, पित्त होणे अशा समस्या आपल्याला वारंवार आढळून येतात .कारल्याच्या वेलाची पाने खाल्ल्यामुळे आपले रक्त स्वच्छ राहते. अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे त्वचेवर येणारे मुरूम डाग हे कायमचे कमी होण्यास मदत होते.

◆कारल्यामध्ये अँटी इंफ्लामेट्री गुण असतात आणि आणि ते त्वचेतून हानीकारक घटकांना बाहेर टाकत असतात यामुळे आपली त्वचाही मुलायम राहते आणि कोणत्याही प्रकारचा त्वचारोग आपल्याला होत नाही.

◆ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्या लोकांना कारले हे रामबाण उपाय आहे.

कारले

 

◆ जर उलट्यांचा त्रास होत असेल तर कारल्याच्या रसामध्ये काळे मीठ टाकून पिल्यास हा त्रास पूर्णपणे कमी होतो.

◆ दमा असलेल्या लोकांनी कारल्याची बिना मसाल्याचे भाजी खाल्ल्यास दम्याचा त्रास कमी होऊन दम्यावर मात करता येते

◆ कर्करोगासाठी कारले हे वरदान आहे . कर्करोगाच्या पेशींना नियंत्रण ठेवण्याचे काम हे कारले करते.

◆ मुतखड्याच्या त्रासावर कारले अत्यंत गुणकारी आहे. रोजच्या आहारामध्ये करण्याचा समावेश केल्यास मूतखडे फुठून बाहेर पडण्यास मदत होते.

◆ कार्याने वजन वेगाने घटण्यास मदत होते लठ्ठपणा किंवा पोट वाढले असल्यास कारल्याचा रस यावर ते गुणकारी ठरतो

◆ यकृताच्या पेशी निर्मिती साठी कारले हे अत्यंत फायदेशीर आहे. कारल्यामुळे यकृत स्वच्छत राहते आणि दीर्घकाळ उत्तम राहण्यास मदत होते.

◆मधुमेह असणाऱ्या लोकांनी कारल्याचा आपल्या जेवणामध्ये समावेश करावा. आपल्या शहरांमध्ये असलेल्या अतिरिक्त साखर शोषून घेण्याचे गुणधर्म हे कार्यालय मध्ये असतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here