आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लहान मुलांच्या पसंतीस उतरलेल्या बोर्नविटाचा इतिहासही तेवढाच प्रसिद्ध आहे.!


 

बोर्नविटा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पूरक आहार पेय म्हणून प्रसिध्द आहे. बोर्नविटा हे सर्वप्रथम बॉर्न-विटा या नावाने ओळखले जात असे.

चॉकलेटचा स्वाद असणारा बोर्नविटा हा ब्रँड पूर्वी केवळ युरोप आणि उत्तर अमेरिकेत विकला जात होता. सध्या हा ब्रँड भारत, नेपाळ, नायजेरिया, घाना, दक्षिण आफ्रिका, बेनिन आणि टोगो येथील लोकांची पहिली पसंद म्हणून उरला आहे.

बोर्नविटा हा जगप्रसिध्द चॉकलेट कंपनी कॅडबरीचा प्रोडक्ट आहे जो १९४८ मध्ये बाजारात आणल्या गेला होता. बोर्नविटा हा कॅडबरीच्या माल्टेड बेव्हरेज विभागातील सर्वात जुना ब्रँड आहे.

बोर्नविटा

 

आज बोर्नविटा हे लहान मुलांमध्ये आणि मातांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. परंतु बोर्नविटाला मिळालेल्या यशाचे समर्थन, धोरणात्मक नियोजन, विपणन(MARKETING) धोरण आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही.

बोर्नविटा हा ब्रँड एव्हढा लवकर प्रसिध्द होण्यामागील काही कारणे.

 

  • बोर्नविटा मार्केटमध्ये आणल्यानंतर त्यांनी त्यांच्या ठराविक ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामध्ये लहान मुले आणि त्यांच्या मातांचा समावेश होता.
  • बोर्नविटा
  • बोर्नविटा हे उत्पादन जेंव्हा बाजारात आले त्यावेळी अन्य कोणतेही पोषक पेय प्रसिध्द नव्हते. बोर्नविटामुळे दुधाची चवच वाढत नाही तर त्यातून वाढत्या वयाच्या मुलांसाठी उपयुक्त अशे अनेक पोषणद्रव्ये आणि जीवनसत्त्वे देखील मिळत होते.
  • बोर्नविटाच्या मार्केटिंग टीमने मुलांना अनेक प्रकारचे गिफ्ट देऊन आकर्षक केले होते.
  • चॉकलेटचा स्वाद असणाऱ्या या पेयाने लहान मुलांना त्यांच्या आवडीचा खास स्वाद दिला, खासकरून त्या मुलांना ज्यांना साधे दुध पिणे आवडत नाही. लवकरच लहान मुलांना बोर्नविटाच्या अद्वितीय चवीची सवयच झाली.

बोर्नविटा

 

बोर्नविटाला सर्वात यशस्वी ब्रँड बनविणारी रणनीती.

 

आपल्या ठराविक ग्राहकांवर पकड मिळवण्यासाठी बोर्नविटाने कधीही कसर सोडली नाही खास करून भारतातील ग्राहकांवर. हा ब्रँड त्याच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि मार्केटिंग धोरणामुळे आजही टिकून राहिला आहे.

बोर्नविटा हा ब्रँड नेहमी बदलत्या काळाशी जुळवून घेण्यास आणि त्याच्या मूळ उत्पादनात बरेच प्रकार बनवण्यास सदैव उत्सुक असतो. याचे उत्तम उदाहरण घ्यायचे झाले तर, २००८ मध्ये बोर्नविटाकडून २-५ वयोगटातील मुलांसाठी बोर्नविटा लिटल चॅम्प्स (BOURNVITA lil Champs) हे उत्पादन सादर केले. ज्यामध्ये व्हे प्रोटीन आणि डीएचए सारख्या मूलभूत घटकांचा समावेश होता, खास बाब म्हणजे याची शिफारस डॉक्टरांनी केली होती.


हेही वाचा:

शीतयुद्ध भडकण्यापासून वाचवणारा हा गुप्तहेर पुढे सीआयएचा सर्वात मौल्यवान एजंट बनला होता.

बॉस्टन टी पार्टीविषयीचे हे 7 आच्छर्यकारक तथ्ये प्रत्येकांना माहिती असायलाच हवे…


 

आणखी एक उत्पादन म्हणजे स्त्रियांसाठी बोर्नविटा (WOMENS BOURNVITA) या उत्पादनाला ३०-४० वयोगटातील महिलांच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी विशेषतः डिझाइन केले आहे.

बोर्नविटा

 

बोर्नविटाच्या टॅग लाईनसुद्धा बाजारात आल्यापासून खूपच आकर्षक आणि प्रेरक राहिल्या आहेत. १९९० च्या काळात बोर्नविटा तन की शक्ती, मन की शक्ती ह्या तर २०१० मध्ये तैयारी जीत कि आणि आता सध्या बोर्नविटा बढाये दूधे की शक्ती हि टॅग लाईन आहे.

या ब्रँडने त्यांच्या जाहिरातींमध्ये नेहमीच मुले आणि त्यांची आई यांचा वापर केला आहे, त्यांच्या जाहिराती स्पष्ठ असा संदेश देतात कि, बोर्नविटा हे काळजी घेणारी माता आणि स्मार्ट मुलांची निवड आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here