आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

घटस्फोट म्हणजे काय ? आपणा सर्वांना माहीतच आहे.

आजकाल आपण पाहत असतो की घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये घटस्फोट घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती , वेगवेगळ्या परंपरा आणि प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत. प्रत्येक देशामध्ये घटस्फोट घेण्याची समस्या मोठ्या प्रमाणात समोर येते.

घटस्फोट घेण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात. जेव्हा वैवाहिक आयुष्याचा रस्ता काही कारणामुळे डगमगला लागतो, जेव्हा कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा माणसे घटस्पोट घेऊन नवीन आयुष्याच्या शोधात असतात.

घटस्फोट घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे बनलेले आहे. परंतु जगामध्ये एक असा देश आहे की तिथे घटस्फोटाचं नाव सुद्धा घेतले जात नाही.

new google
घटस्फोट
घटस्फोट

जगामध्ये फिलिपिन्स हा एकमेव असा देश आहे जिथे घटस्पोटा साठी कोणत्याही प्रकारची न्यायव्यवस्था बनलेली नाही . तसं पाहायला गेलं तर फिलिपिन्स हा कॅथोलिक देशांच्या समूहाचा एक भाग आहे. कॅथोलिक चर्चच्या प्रभावामुळे या देशात घटस्फोटाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तरदूत केलेली नाही.

 

सन 2015 मध्ये जेव्हा फ्रान्सिस पोप फिलिपिन्समध्ये गेले होते, तेव्हा तेथील धर्मगुरूंना त्यांनी विनंती केली की फिलिपिन्समधील ज्या लोकांना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांच्याशी सहानभूतीचा व्यवहार ठेवायला हवा . परंतु फिलिपिन्समध्ये ‘ घटस्फोटिक ‘कॅथोलिक ‘ पुन्हा अपमान कारक मानले जाते.

फिलिपिन्स मधील ख्रिश्चन धर्मगुरूंनी फ्रान्सच्या पोपने केलेल्या विनंतीला मान्य केले नाही. खरंतर त्यांना या गोष्टीचा गर्व आहे की फिलिपिन्स हा देशातील एकमेव असा देश आहे की जिथे घटस्फोट घेतला जात नाही. घटस्फोट हा योग्य आहे याचा प्रस्ताव फिलिपिन्समध्ये अगोदरच मांडला गेला आहे परंतु राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही.

घटस्फोट

फिलिपिन्स वर जवळपास चार शतके स्पेनचा राजा राज्य करत होता. त्यादरम्यान येथील बहुतांश लोकांनी ख्रिश्चन धर्मचा स्वीकार केला होता. समाजामध्ये कॅथोलिक परंपरेने त्यांचे नियम बांधून आपली मुळे मजबूत केली होती. परंतु सण 1898 साली स्पेन-अमेरिका युद्ध झाले आणि फिलिपिन्स अमेरिकेच्या आधिपत्याखाली गेला. त्यानंतर ह्या देशांमध्ये घटस्फोटाच्या संबंधी एक कायदा बनवला गेला.

सन 1917 मध्ये केलेल्या कायद्यानुसार लोकांना घटस्फोट घेण्याची परवानगी दिली परंतु एक अटीनुसार. ही अट अशी होती की पती-पत्नी या दोघांपैकी कोणीही जर विवाहबाह्य संबंध करताना सापडला गेला तर घटस्फोट दिला जाईल.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फिलिपिन्स वर जेव्हा जपान ने कब्जा केला तेव्हा यासंबंधी एक नवीन कायदा आणण्यात आला . परंतु हा कायदा थोड्याच काही वर्षासाठी ठेवण्यात आला. कारण जेव्हा 1944 मध्ये पुन्हा अमेरिकेने फिलिपिन्स कब्जा केला तेव्हा पूर्वीचा कायदा ठेवण्यात आला.

सन 1950 मध्ये पुन्हा फिलिपिन्स अमेरिकेच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यांनतर ख्रिस्ती धर्मानुसार आणि चर्चेच्या प्रभावामुळे घटस्फोटाचा कायदा माघार घेण्यात आला. तेव्हापासून फिलिपीन्स देशांमध्ये घटस्फोटावर बंदी घातलेली आहे ते आज पर्यंत कायम आहे.

अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की घटस्फोट बंदी हे फक्त ख्रिश्चन धर्मासाठी आहे तेथे असलेले मुस्लिम लोक आपापल्या धर्माच्या नियमनुसर घटस्टफोट घेऊ शकतात.

 

माहितीपूर्ण व्हिडीओ :

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here