आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर CPEC प्रकल्पाच्या नावाखाली चीनचे कारस्तान!

पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर काही दिवसांपासून चीनचे गुप्त कारस्थान सुरु आहे. चीन ग्वादर बंदराजवळ लष्करी तळासोबतच दहा फुट उंच भिंतीचे कुंपण घालत असल्याचे समोर आले आहे.

 

ग्वादर

 

३० किमी लांबीच्या या कुंपणामुळे बलुचिस्तानचे लोक आता पाकिस्तानी सरकार आणि चीनी लष्करांवर चिडलेले आहेत. CPEC प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणार्या या कुंपणावर ५०० HD कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

CPEC प्रकल्पांतर्गत ग्वादर याठिकाणी किंपण घालून, पाकिस्तान आणि चीनी सैनिक याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत, जेणेकरून याठिकाणी कोणीही मिडिया किंवा मानवाधिकार कार्यकर्ते येऊ नये आणि बलुचिस्तानच्या जनतेचा आवाज असाच दडपून राहावा. हा यामागचा मुल हेतू आहे.

CPEC ऑथोरिटीने ग्वादर बंदरावर १५००० स्पेशल सिक्योरिटी डिविजनच्या जवानांना तैनात केले आहे, यामध्ये पाकिस्तान लष्कराचे ९००० तर चीनी आर्मीचे ६००० जवान सामील आहेत. इतकी सुरक्षा ठेवण्याचा हेतू CPEC प्रकल्पसोबातच चीनी इंजिनियर्सना सुरक्षा प्रदान करणे हा आहे.

 

ग्वादर

 

चीन ग्वादर बंदराजवळ लष्करी तळ उभारून याठिकाणी मोठ्या संखेने PLA सैनिकांना तैनात कारणार आहे, ग्वादर विमानतळाचा उपयोगही चीन आपल्या फाइटर जेट्सला तैनात करण्यासाठी वापरणार आहे, हि भारतासाठी चिंतेची बाब आहे.

ग्वादर बंदराचे आंतरराष्ट्रीय महत्व.

ग्वादर बंदर हे अत्यंत महत्वाचे बंदर आहे कारण जगातील ३५ % कच्चे तेल हे याच मार्गाने जाते. आता चीन आपल्या देशात CPEC प्रकल्पाच्या नावाखाली ग्वादर बंदराच्या मार्गाने कच्च्या तेलाची आयात करणार आहे.

याचा फायदा आता सरळ चीनला मिळणार आहे कारण, त्यांच्या तेलाच्या जहाजांना आता हिंदी महासागरात जाण्याची गरज पडणार नाही. म्हणूनच चीनने पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here