आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

एका राजनीतिक चुकीमुळे हे मोठे बंदर कायमचे पाकिस्तानमध्ये गेले होते.


भारतामध्ये जेंव्हा कधी चीन आणि पाकिस्तानची एकत्र चर्चा केली जाते, त्यावेळी ग्वादर बंदराचा उल्लेख हमखास केल्या जातो. पाकिस्तानच्या या बंदराला चीन आपल्या फायद्यासाठी करोडो रुपये खर्च करून विकसित करत आहे. भारताला दबावामध्ये ठेवण्यासाठी ग्वादर हे पोर्ट चीनसाठी हुकुमी एक्का बनले आ हेहे मात्र नक्की.

 

new google

ग्वादर बंदराची भौगोलिक स्थिती हि भारताला घेरण्यासाठी प्रतिकूल आहे परंतु भारत आता याठीकानाहून केवळ १७० किलोमिटर दूर इराणमधील चाबाहर बंदराला विकसित करत आहे. भारताने उचललेल्या या पावलाला ग्वादर प्रती चीनसाठी प्रतीहल्लाच मानल्या जात आहे. ग्वादर हे बंदर १९५८ पर्यंत पाकिस्तानचा भाग नवता.

भारताकडून झालेल्या लहानश्या राजनीतिक चुकीमुळे आज ग्वादर हे बंदर पाकिस्तानचा हिस्सा आहे.

ग्वादरचा इतिहास.

बंदर

ग्वादर ज्याठिकाणी स्थित आहे त्या ठीकानाला मकरान असेही म्हटल्या जाते. ग्वादरला सिकंदरचा वारासापण लाभलेला आहे. इस पूर्व ३२५ ला जेंव्हा सिकंदर भारत सोडून जात होता त्यावेळी ती ग्वादरला पोहचला होता. त्यानंतर १०० वर्ष चंद्रगुप्त मौर्य साम्राज्यकर्त्यांनी ग्वादरवर आपली सत्ता ठेवली होती. इस ७११ मध्ये मोहम्मद बिन कासीम याने
हल्ला करून पूर्ण ग्वादर आपल्या ताब्यात घेतले आणि त्यानंतरच याठिकाणी बलुच काबिल्यांचे वर्चस्व राहिले.

१५ व्या शतकात पोर्तुगीजांनी वास्को डी गामाच्या नेतृत्वामध्ये ग्वादरवर हल्ला केला. परंतु मीर इस्माईल बलुच याच्या सेनेपुढे पोर्तुगिजांचा निभाव लागला नाही, याचाच राग आल्याने त्यांनी ग्वादराला आग लावून टाकली होती. १६ व्या शतकात अकबराने ग्वादरवर हल्ला करून आपले साम्राज्य स्थापित केले होते. १८ व्या शतकापर्यंत ग्वादरवर मुघलांनी राज्य केले होते.

१९४७ ला इग्रज भारत सोडून गेले परंतु त्यांनी भारताला दोग भागात वाटून टाकले आणि मकरान हे पाकिस्तानमध्ये सामील झाले आणि पाकिस्तानमधील एक जिल्हा घोषित करण्यात आले. यावेळीसुद्धा ग्वादरवर सत्ता हि ओमानचीच होती परंतु येथील जनता हि पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी आंदोलन करत होती. १९५४ मध्ये पाकिस्तान सरकारने
ग्वादरयेथे बंदर बनवण्यासाठी अमेरिकेसोबत बोलणी सुरु केली होती. अमेरिकन जियोलॉजिकल सर्वेच्या टीमने याठिकाणी सर्वे केला असता त्यांना कळले कि, याठिकाणी डीप सी पोर्ट म्हणजेच मोठमोठ्या जहाजांना अनुकूल बंदर बनवण्यासाठी चांगली जागा होती.

बंदर भारत आणि ओमानचे संबंध हे फार चांगले असल्यामुळे पाकिस्तानला अशी भीती होती कि, ग्वादर ला ओमान हा भारताकडे सुपूर्द करू शकतो, महणून पाकिस्तानचे पंतप्रधान फिरोज सहा नून हे ओमानच्या दौर्यावर गेले आणि तेथील सुलतान सोबत जवळपास तीन मिलियन डॉलर रक्कम देऊन ग्वादरचा सौदा केला. ८ डिसेंबर १९५८ पासून ग्वादर हे
पाकिस्तानचा भाग बनले. आज ते मकरान जिल्ह्यात एक तालुक्याचे ठिकाण आहे.

भारतात आजही काही लोकांचे मानाने आहे कि, ओमानचे सुलतान हे ग्वादर भारताला देणार होते परंतु भारत सरकारचे अशे मानाने होते हि ७०० किमी दूरच्या याठीकानाला पाकिस्तानपासून सुरक्षित ठेवणे हि मुश्कील गोष्ठ आहे. आणि आज याच बंदरामुळे पाकिस्तानला कित्तेक गोष्ठीन्मध्ये फायदा होत आहे. १०१३ मध्ये पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये
झालेल्या सामंजस्य करारानुसार पाकिस्तानने ग्वादर बंदर हे ४० वर्षांसाठी किरायाने दिले आहे.

भारताने त्यांच्या या हुशारीला जबाब देत याठीकानापासून १७० किमी दूर अंतरावर चाबाहर बंदर विकसित करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे. अमेरिकेने इराणवर लावलेल्या प्रतीबंधांमुळे चाबहार बंदर हे त्यांच्या कब्जात येऊ शकते. जर असे झालर तर हि भारतासाठी नुकसानीची बाब ठरणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here