आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

7 वर्षाच्या वयात हा मुलगा विमान उडवतोय! वाचा सविस्तर…

 

आफ्रिका महाखंडातील युगांडा या देशातील केवळ सात वर्षीय मुलांन संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. अवघ्या सात वर्षाचा हा मुलगा चक्क विमान उडवायचे शिकून पायलट झाला आहे. कॅप्टन ग्राहम शेमा या नावाने सोशल मिडीयावर प्रसिध्द झालेल्या या बालकास जर्मनीच्या राजदूताने आणि युगांडाच्या वाहतूक मंत्र्यांनी अनेकवेळा आमंत्रित केलेले आहे.

 

ज्या वयात लहान मुले बेरीज-वजाबाकी शिकतात त्या वयात पायलट बनल्यामुळे कॅप्टन ग्राहम शेमा यांची सर्वत्र चर्चा होत आहे. जाणून घेऊया कॅप्टन ग्राहम शेमा यांच्या बद्दल काही महत्वाच्या गोष्ठी….

 

विमान

सात वर्षाच्या ग्राहम शेमाला सर्वांना अवघड वाटणारे विषय म्हणजेच गणित आणि विज्ञान हे जास्त आवडतात. टेस्ला आणि स्पेसएक्स चे संस्थापक एलोन मस्क हे या बालकाचे रोल मॉडल आहेत. एलोन मस्क का आवडतात असे विचारल्यानंतर कॅप्टन ग्राहम शेमा म्हणतात,

“मस्क यांच्यासोबत मला अंतरीक्ष आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती शिकायची आहे, त्यांच्यासोबत मला अंतराळात जायला फार आवडेल आणि मला त्यांच्याशी भेटायचे आहे”.

 

कॅप्टन ग्राहम शेमाने ट्रेनी पायलट म्हणून याच वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान CESSNA 172 या विमानाला तीन वेळा यशस्वीपणे उडवण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे त्यांना मार्चनंतर एकही विमान उडवता आले नाही.

 

युगांडाच्या एंटेबे अंतरराष्ट्रीय विमानतळावर एकवेळेस ग्राहम शेमा यांना प्रशिक्षण देणाऱ्या पायलटने बॉम्बार्डियर CRJ9000 या विमानाचे इंजन कशाप्रकारे काम करते? हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर ग्राहमने ज्याप्रकारे सविस्तर माहिती त्यांच्या प्रशिक्षकाला दिली ते एकूण सर्वजन चकित झाले होते, त्यांना प्रश्न पडला आहे कि एवढ्या लहान वयाचा हा मुलगा ह्या सर्व गोष्ठी कशाप्रकारे आठवणीत ठेवतो?

 

विमान

 

ग्राहमबद्दल विचारल्यास त्याच्या आईने एक घटना सांगितली होती, एकवेळ ग्राहम शेमा आपल्या घराबाहेर खेळत असताना पोलिसांचे एक हेलिकॉप्टर अगदी खालून उडत गेले ज्यामुळे ग्राहमाच्या छताला नुकसान पोहचले होते या घटनेनंतर त्यांच्या मनात विचार येत होता कि, हे विमान कश्याप्रकारे उडवले जाते?

 

त्याच दिवसापासून ग्राहम शेमा याने विमानाबद्दल सर्वकाही शिकण्याचा निश्चय केला होता. हे सर्व घडले त्यावेळी ग्राहमचे वय होते केवळ तीन वर्ष. हि सर्वांना विश्वास न होणारी बाब आहे.

 

कॅप्टन ग्रॅहम शेमाच्या आईने स्थानिक एविएशन एकेडमीमध्ये ग्राहमला दाखील केले, याठिकाणी ग्राहमाने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी एव्हिएशन अकॅडमीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आणि विमान उड्डाण यासंबंधित अनेक व्हिडिओ पाहून ग्राहम शेमा याने हे सर्व ज्ञान मिळवले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here