आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

असा झाला होता भगवान दत्त यांचा जन्म. (दत्त जन्माची अलौकिक कथा) वाचा सविस्तर….

 

महायोगीश्वर भगवान दत्त हे विष्णूचा अवतार आहेत. दत्त गुरूंचा अवतार मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता, म्हणूनच दरवर्षी या दिवशी मोठ्या भावाने दत्त जयंती साजरी केली जाते.

 

श्रीमद्भभगवतामध्ये असा उल्लेख आहे कि, पुत्र प्राप्तीसाठी महर्षी अत्री यांनी व्रत केल्यावर “दत्तो मयाहमिति यद् भगवान्‌ स दत्तः” मी स्वताला तुम्हाला दिले आहे असे भगवान विष्णूने म्हटल्यावर, ते स्वतःच अत्री ऋषींच्या समोर अग्नी रुपात अवतरीत झाले, आणि दत्त या नावाने ओळखल्या जाऊ लागले.

 

दत्तात्र्यय

 

दत्त आणि आत्रेय (आत्री ऋषी) या दोन नावाच्या संयोगाने त्यांचे नाव दत्तात्र्यय म्हणून प्रसिध्द झाले. गुरु दत्त यांची माता अनुसया यांचा पतिव्रता धर्म सर्व जगाला माहित आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे, त्यानुसार ब्राह्मणी, रुद्रानी आणि लक्ष्मी यांना त्यांच्या पतीव्रत धर्माचा अभिमान वाटू लागला. देवाला त्यांचा हा अभिमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी एक लीला करण्याचा विचार केला.

 

सर्व देव यावर विचार करत होते तेंव्हा त्यांना नारद मुनीचा विचार आला, त्यांनी याबद्दल सविस्तर नारदाला सांगितले. नारद बारीबारीने तीनीही देविंजवळ जातो आणि त्यांना सांगतो कि, पृथ्वीवरील माता अनुसायाच्या पतिव्रता धर्मासमोर तुमचे पतिव्रता धर्म हे काहीही नाही. हे ऐकल्यावर तीनीही देव्या आपापल्या पतीला ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना नारदाने संगलेली गोष्ठ सांगतात आणि माता अनुसयाच्या पतीव्रताची परीक्षा घ्यायला सांगतात.

 

देवांनी बरेच काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिन्ही देव्यांच्या हट्टापुढे ते हतबल झाले होतें. अखेरीस ब्रम्हा, विष्णू, आणि महेश हे तिघेही साधू बनवून अत्रिमुनिच्या आश्रमात पोहोचले. त्यावेळी महर्षी अत्री हे आश्रमात नव्हते, साधू पाहुणे बनून आपल्या आश्रमात आलेले बघून माता अनुसायाने यांना प्रणाम करून कंदमूळ खाण्यासाठी दिले. परंतु अनुसयाची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने आलेल्या देवांनी त्यांना अट घातली कि, जोपर्यंत तुम्ही आम्हाला आपल्या मांडीवर बसवून जेऊ घालणार नाही तोपर्यंत आम्ही आदरातिथ्य स्वीकारणार नाही.

 

दत्तात्र्यय

 

साधूंनी सांगितलेली अट ऐकूण प्रथम माता अनुसया चकित झाल्या, परंतु नंतर आतिथ्य धर्माची महिमा नष्ठ होईल असा विचार करून त्यांनी भगवान नारायण यांचा जप केला, आपल्या पतिदेवाचे स्मरण केले. तेंव्हा यामागचा सर्व भाव समजून त्या म्हणाल्या, जर माझा पतिव्रता धर्म सत्य आहे तर हे तिन्हीही साधू सहा महिन्यांचे बालक होतील. त्यांनी असे म्हणताक्षणी तिघेही देव लहान मुलांमध्ये परावर्तीत झाले.

 

लहान मुलांना माता अनुसयाने आपल्या मांडीवर घेऊन दुध पाजले आणि पाळण्यामध्ये झोपवले. बरेच दिवस झाले तरीही देव लोकात हे तीन देव परत न आल्याने तिन्हीही देव्या व्याकूळ झाल्या होत्या. त्यांनी आता नारदाकडे धाव घेतली आणि त्यांच्यासमवेत माता अनुसायाकडे जाऊन त्यांची माफी मागितली.

 

तिन्ही देव्या गयावया करताना बघून माता अनुसायाने आपल्या पतिव्रता धर्माने तिन्हीही बालकांना आपल्या पूर्वरूपात परत आणले. हे बघून प्रसन्न झालेल्या देव्यांनी माता अनुसायला वर मागण्यास सांगितले, तेंव्हा अनुसयाने वर मागितला कि हे तिन्हीही देव पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्माला यावे. तथास्तु म्हणून देव्यांनी त्यांना वरदान दिले आणि कालांतराने हे तिन्हीही देव माता अनुसयाच्या पोटून जन्माला आले. आणि याच तिथीला आपण दत्त जयंती साजरी करतो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here