आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

केशरचे एवढे फायदे जाणून हैराण व्हाल, दुधात मिसळून पिल्यास होतील हे फायदे..


केशर आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. केशरमध्ये 150पेक्षाही जास्त असे औषधी तत्व असतात. जे आपल्या शरीरास पूर्णपणे आरोग्यदायी ठेवण्यास मदत करतात. केशरला जगातील सर्वांत महाग मसाल्यापैकी एक मसाला मानल्या जाते.

साधारणपणे याचा उपयोगदुध आणि दुधापासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपीमध्ये केल्या जातो. परंतु याच्यात अनेक असे गुण आहेत जे तुम्हाला खतरनाक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

 केशर

आजच्या या लेखामध्ये आपण केशरचे आरोग्यदायी फायदे आणि त्याच्यातील अत्यंत गुणकारी अश्या औषधी तत्वाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

आपल्या माहितीसाठी कोणत्याही व्यक्तीने दररोज फार फार तर १ ते ३ ग्राम केशर खायला हवे, यापेक्षा जास्त केशर खाल्यास तुम्हाला अनके गंभीर आजारांना सामोरी जावे लागू शकते.

हिवाळ्यात फायदेमंद आहे केशर.

हिवाळ्यात सर्दी, खोकला यांसारख्या छोट्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी केशर खूप लाभदायक आहे. गरम केलेल्या दुधात चिमुटभर केशर आणि मध मिसळून तो घ्यावा. याचे सेवन केल्याने आपणास काही वेळातच
असर दिसायला सुरवात होईल.

कैंसर वर उपायदायक:

कैंसर झालेल्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी केशर महत्वाची भूमिका बजावते. केशरमध्ये क्रोसीन, कोलोरेक्टल यांसारखे गुण असतात जे वाढत्या कैंसरच्या सेल्सला जास्त वाढू देत नाहीत. केशरच्या सेवनाने सर्वांत जास्त प्रभाव हा प्रोस्टेट आणि त्वचेच्या कैंसरवर पडतो.

केशर

संधिवातून मुक्त होण्यास मदत:

संधिवाताच्या समस्येपासून सुटकारा मिळवायचा असेल तर तुम्ही केशरचा उपयोग केला पाहिजेत. केशरमध्ये असणारे क्रोशेटीन हे शरीरावर आलेली सूज कमी करण्यास मदत करतात.
याशिवाय तुम्ही केशरच्या पानाचे पेस्ट बनवून गुढघ्यावर, जोड्यावर लावावेज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

डोकेदुखीवर असरदार :

सारख्या डोकेदुखीमुळे हैराण असाल तर सोपा उपाय म्हणजे तुपामध्ये केशर आणि साखर टाकून त्याला गरम करून घ्या. आणि त्याचे १/२ थेंब आपल्या नाकामध्ये टाका.
असे केल्यास तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. शिवाय सर्दी होण्यापासून सुद्धा तुमचे रक्षण होईल.

झोप येत नसल्यास उपयोगी:

जास्तचा थकवा आणि ताण या कारणामुळे जास्तीत जास्त लोकांना झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अश्या स्थितीत केशर घातलेले दुध पिणे लाभदायक ठरू शकते.
एका रिसर्चनुसार केशरमध्ये असलेले क्रोसिन झोप वाढविण्यासाठी मदतगार आहेत. अस समोर आले आहे.ज्यामुळे केशरच्या सेवनाने तुमचा झोप न येण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो.

 

पचन क्रिया व्यवस्थित ठेवन्यास मदत:

केशर मध्ये एन्टीऑक्सिडेट आणि एंटीइंफ्लेमेट्री गुण असतात जे पचन तंत्रास ठीक ठेवन्यास मदत करतात. याशिवाय केशर अल्सरपासून सुद्धा सुटकारा मिळवण्यास मदत करते.

चेहऱ्यावर चमक आणते:

चमकदार चेहरा हवा असल्यास केशरचाहा उपाय नक्कीच फायदेमंद ठरेल. केशर आणि चंदनाचे मिश्रण दुधामध्ये
मिसळून फेसपॅक तयार करा.या मिश्रणाला २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून काढा..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

कुली नं.1 पाहण्याचा प्लान करताय, अगोदर हे वाचाच..

व्हिडीओ प्लेलिस्ट :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here