आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

कर्नाटकातील बेळगाव पासून अवघ्या २८ किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या देशानुर गावात एकाच छताखाली मंदिर आणि चर्च आहेत, याच कारणामुळे हे गाव सर्वत्र प्रसिध्द आहे. देशानुर मधील या मंदिराचे नाव आहे, स्नानिका अरुलाप्पनवर विरक्त मठ किंवा सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च. एकीकडे लोक धर्माच्या नावाखाली दुसऱ्या धर्मियांना त्रास देताना दिसून येतात, परंतु या गावातील लोकांची सर्वधर्म समभाव हि भावना सर्वानीच आत्मसात करण्यासारखी आहे. चला जाणून घेऊया या गावाबद्दल प्रसिध्द असलेल्या काही गोष्ठी.

 

बनारसी नगारा शैलीमध्ये दगडांनी बनवलेली हि संरचना सिंक्रेटिझमचे उत्तम उदाहरण आहे. याठिकाणी एकाच मंदिरात शिव लिंग आणि येशू ख्रिस्त यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय मदर मेरी, संत कवी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमाही आहेत. मंदिराच्या सर्व भिंतींवर लिंगायत समाजाचे कवी संगीतकार पुरंदर दासा आणि बायबलच्या काही प्रेरणात्मक ओळींनी सजवलेले आहे.

new google

 

मंदिर

 

चर्च आणि मंदिराचे पुजारी मेनिनो गोन्साल्वेज (Menino Gonsalves)

चर्च चालवणारे Jesuit priest मेनिनो गोन्साल्वेज (Menino Gonsalves) उर्फ ​​श्री मेनिनो स्वामी हे पण एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे, भगवे वस्त्र आणि त्यासोबत रुद्राक्षाच्या माळा आणि क्रॉस परिधान करतात. त्याठिकाणी येशू यांची मास आणि शिवलिंगाची आरती हे दोन्हीही काम ते एकटेच करतात. आरती आणि मास एकत्र पाहणे, ऐकणे हा सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

 

पुजारी मेनिनो गोन्साल्वेज यांनी हरिद्वार, ऋषिकेश आणि व्हॅटिकन सिटी इत्यादी ठिकाणी घेती दिलेल्या आहेत. त्यांचे आठ भाषांवर प्रभुत्व आहे. देशानुर गावात एकही ख्रिश्चन व्यक्ती नसताना देखील, याठिकाणी रविवारी चर्चमध्ये भरपूर गर्दी असते.

 

मेनिनो गोन्साल्वेज म्हणतात, ” मी अशे कोणतेही कार्य करत नाही ज्यामुळे मला अस्वस्थ वाटेल किंवा लोकांचा माझ्यावरच विश्वास कमी होईल. मी केवळ या दोन संस्क्रतींचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. धर्म प्रचार करणे हा माझ्या नित्यकर्माचा छोटासा हिस्सा आहे. माझा जास्त वेळ तर अध्यापन, उपचार आणि सामाजिक कार्यात निघून जातो.

 

मंदिर

मंदिराचे संस्थापक फादर अरमाडो अल्व्हारेस (Armado Alvares)

हि परंपरा या मठाचे संस्थापक फादर अरमाडो अल्व्हारेस (Armado Alvares) यांनी केली होती. त्यांना सर्वजन अनिमानंद स्वामी याच नावाने ओळखायचे. त्यांचे पूर्वज हे गोव्याचे होते.

परंतु त्यांचा जन्म आफ्रिकेमध्ये झाला होता, तिथे त्यांचे वडील हे सरकारी पदावर काम करत होते. १९०३ मध्ये ते शिक्षणासाठी गोव्याला परत आले,आणि काही दिवस शिक्षक म्हणून नोकरी पण केली.

देशानुर येथे स्थाईक होण्यापूर्वी त्यांनी बेळगाव मध्ये शिकाकाची नोकरी केली. भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी देशानुर मध्ये निराधार मुलांसाठी अनाथ आश्रम आणि १९५३ मध्ये मुलींसाठी कन्नड माध्यम
शाळा सुरु केली होती.

 

दशकांपासून उभ्या असलेल्या या मंदिराचे सर्व श्रेय हे या गावकऱ्यांना दिले जाते कारण त्यांच्या या मोठ्या मनाच्या प्रवर्ती मुळेच हे सर्व काम सुरळीत पार पडत आहे. या मंदिराला गावकरी हे मंदिर गुढी आणि चर्चला पादरी मठ म्हणतात.

मकर संक्रांती आणि क्रिसमस हे दोन्हीही सन याठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. पुजारी मेनिनो म्हणतात, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो त्यांना सर्व धर्म हे सारखीच शिकवण देतात.

हिंदूंनी चांगले हिंदू व्हावे, मुस्लिमांनी चांगले मुस्लीम व्हावे, आणि ख्रिश्चनांनी चांगले ख्रिस्चन व्हावे हीच त्यांची अपेक्षा असते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here