आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

खरच 2021 मध्ये जग संपणार आहे? काय आहे हा प्रकार वाचा सविस्तर…

साडेतीन हजार वर्ष जुन्या माया संस्कृतीच्या कैलेंडरमुळे लोकांच्या मनात आता 2021 मध्ये पूर्ण जगाचा अंत होण्याची भीती निर्माण होत आहे. काही लोक असा दावा करत आहेत कि, या युगाचा अंत आता जवळ आला आहे.

कोरोणा महामारीमुळे जग 2021 मध्ये संपणार आहे, यापूर्वी 21 डिसेंबर 2012 मध्येही अशाच प्रकारचे दावे या कैलेंडरमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती हॉलीवूडने बनवलेल्या 2012 या चित्रपटामुळे.

 

2021
IMAGE – 2012 MOVIE POSTER

हॉलीवूडनेही  2012 नावाचा चित्रपट बनवून ही भीती सत्य असल्याचे सिद्ध करण्यास कसर सोडली नव्हती.

2012 मध्ये करण्यात आलेला दावा.

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सुमारे 1500 वर्षांपूर्वी मेक्सिको आणि अमेरिकेत विकसित झालेल्या माया सभ्यतेच्या दिनदर्शिकेत (Mayan Calendar) 21 डिसेंबर 2012 च्या पलीकडे कोणतीही तारीख नव्हती.

याच्या आधारे, ही अफवा पसरविली गेली होती की 2012 मध्ये संपूर्ण जगाचा विनाश होणार आहे, उल्का आकाशातून वाहतील. तारे तुटून पृथ्वीवर पडतील तसेच पृथ्वीच्या गर्भातून महाभयंकर भूकंप होईल आणि त्यामुळे कोणीही जिवंत राहणार नाही.

हि अफवा संपूर्ण जगात आगीसारखी पसरली होती आणि प्रत्येकजण भीतीच्या वातावरणात वावरत होते. सर्वांच्या मनामध्ये एकाच विचार चालत होता तो म्हणजे, खरच जन संपणार आहे कि काय? परंतु वास्तविकतः असे काहीच घडले नाही आणि माया सभ्यतेच्या दिनदर्शिकेने दर्शवलेला हा दावा खोटा ठरला. हि सभ्यता 800 AD वर्षांपूर्वी संपली होती, असे शास्त्रज्ञांचा दावा आहे.

माया सभ्यतेचे हे दावे अद्याप संपलेले नाहीत, काही लोकांनी आता असा दावा केला आहे कि, 21 जून 2020 मध्ये हे जग संपणार आहे. याच दाव्याच्या समर्थनार्थ वैज्ञानिक पाओलो टागोलिन यांनीही ट्विट केले आहे. मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. हि तारीख गेली तर आता 2021 बद्दलच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे.

 

2021

खरच 2021 मध्ये जग संपणार आहे?

कॅलेंडर निर्मात्यास महाप्रलयाची तारीख माहित होती की नाही हे कोणालाही निश्चितपणे माहित नाही. परंतु 21 डिसेंबर 2012 पासून पुढची कोणतीही तारीख त्याच्या दिनदर्शिकेत नव्हती. ज्यानंतर 2012 आणि नंतर 2020 मध्ये महाप्रलय होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आणि आता 2021 बद्दल पुन्हा एकदा असेच वातावरण तयार केले जात आहे.

जसे ग्रेगोरियन दिनदर्शिकेत 31 डिसेंबर ही वर्षाची शेवटची तारीख आहे. त्याचप्रकारे 21 डिसेंबर 2012 ही माया दिनदर्शिकेतील एखाद्या युगाच्या समाप्तीची शेवटची तारीख होती. आणि गोलाकार दगडावर कोरलेल्या या कॅलेंडरमध्ये
पुढील तारखांसाठी जागा शिल्लक नव्हती.

म्हणून पुढील तारखेचा उल्लेख केला गेला नाही. आता हि केवळ अफवा आहे कि यामध्ये काही सत्यता आहे हे केवळ 2021 वर्ष संपल्यानंतरच कळणार आहे मात्र नक्की. तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here