आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

अकबर दरबारातील अनमोल रत्न असलेल्या बिरबलचा मृत्यू कशाप्रकारे झाला होता? वाचा सविस्तर….

 

बादशहा अकबराच्या दरबारात 9 रत्न होते, त्यांच्यापैकी बिरबल हे आपल्या बुद्धीबळाच्या कौशल्याने सर्वत्र प्रसिद्ध होते. चाणक्ष बुद्धीने अकबर बादशहाला अनेकवेळा पेचक परिस्तिथी मधून त्यांनी सावरले होते. मोठ्यात मोठी समस्या आल्यासाही बिरबल ती सोडवण्यात पुढे असे. बिरबलच्या अनेक बोदकथा आपण एकल्या आणि वाचल्या असतील परंतु आज आम्ही तुम्हाला त्या घटनेविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे कुशाग्र बुद्धीच्या या अनमोल रत्नाचा अतिशय दयनीय परिस्तिथीत मृत्यू होतो. वाचा सविस्तर….

 

new google
अकबर
अकबर दरबारातील अनमोल रत्न बिरबल

 

अकबराच्या दरबारात बिरबलाचे स्थान हे सर्वात महत्वाचे होते. बिरबलाचा जन्म हा 1528 मध्ये उत्तर प्रदेशातील कापली नामक गावी झाला होता. त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अकबर बादशहाने बिरबलाला आपल्या दरबारातील 9 रत्नामध्ये सामील केले होते.

 

ही घटना आहे 1586 ची, यावेळी अफगाण मधील काही टोळ्यांनी मुघलांविरोधात विद्रोह केला अणि अकबरावर हल्ला केला होता. हे बघून अकबराने निर्णय घेतला की, कोका खान अणि बिरबल यांनी त्याठिकाणी जावे अणि हा विद्रोह हाणून पाडावा. या योजनेअंतर्गत दोघांनीही अफगाणिस्तान कडे अगेकूच केली.

 

अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कोका खान याने बिरबलला सांगितले, तू एक हिंदू राजा असल्यामुळे मला तुज्यासोबत युद्धात भाग घ्यायचा नाही. युद्ध अणि आपली सेना सोडून कोका खान माघारी परतला.

 

अकबर
बिरबलचा मृत्यू हा अफगाणी सैनिकांच्या हाताने झाला होता.

 

कोका खान माघारी परतला तरीही बिराबलने दुश्मनांवर आक्रमण सुरूच ठेवले. शेवटी त्यांची सेना कमजोर पडत होती, अतिशय चाणक्ष बुद्धी असली तरीही बिरबल हतबल झाला होता. युद्धामध्ये कशाप्रकारे नेत्रत्व करतात हे बिरबल यांना माहित नव्हते. किंवा त्यांना युद्धाचा जास्त अनुभव नव्हता असे म्हणनेही वावगे ठरणार नाही, कारण आपण बिरबलच्या अनेक कथा वाचल्या आहेत त्यामध्ये क्वचितच युद्धाचा प्रसंग आहे.

 

बिरबल आपल्या 8000 सैनिकांसोबत त्याठिकाणी फसले होते अणि त्यांना चारीही बाजूने दुश्मनांनी घेरले होते. त्याचवेळी दुश्मनांनी बिरबल अणि त्याच्या सैनिकांवर डोंगरावरून दगड अणि गोळे फेकण्यास सुरुवात केली. त्याठिकाणावून बाहेर निघण्यास कोणताही रस्ता नसल्यामुळे सर्वजण घायाळ झाले होते. दगड अणि तोफेच्या गोळ्यांनी सर्वजण दबून गेले होते.

 

आपल्या बुद्धीने सर्वांना तोंडात बोट घालण्यास मजबूर करणाऱ्या बिरबलचा अशा पारीस्तिथी मध्ये दुःखद मृत्यू झाला होता. बिरबलच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी ही कोणीही भरून काढू शकले नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here