आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

पोटदुखीच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर करा हे घरगुती उपाय…


आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजारपणामुळे त्रस्त असतो कधी तीव्र ताप ,थकवा, कधी डायबिटीज अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवत असतात, परंतु तुम्हाला माहित आहे का , अशा अनेक प्रकारच्या आजारांच्या पाठीमागे आपल्या पोटाच्या तक्रारी चा मोठा परिणाम असतो.

असे म्हटले जाते की जर आपले पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपण जास्त प्रमाणात आहाराचे सेवन केले तर आपल्याला पोटाचा जडपणा किंवा कुस्ती जाणवायला सुरुवात होते .या कारणामुळे आपणाला आळस येणे ,बेचैन होणे, झोप येणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या गोष्टींचा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रास होतो,

पोटदुखी

जर आपण अशा स्थितीमध्ये असेल तर कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही. जर ठरवलेले काम व्यवस्थित पण होत नसेल तर आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. पोटाच्या या तक्रारी पासून आपली सुटका करून घेण्यासाठी जाणून घेऊया  त्यावरील घरगुती उपाय..

पोटांचा जडपणा दूर करण्यामध्ये मध आपणास मोठ्या प्रमाणात मदत करतो. दररोज आपण जेवण केल्यानंतर एक चमचा मधाचे सेवन केले तर जेवल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅस पकडणे या समस्येपासून आपली सुटका होण्यास मदत होते. त्याचबरोबर दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने आपली पचन प्रक्रिया व्यवस्थित काम करते त्यामुळे गॅस पकडणे ही समस्या उद्भवत नाही. त्याचबरोबर पोट साफ राहिल्याने आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते आणि आपल्याला विविध प्रकारचे आजार न होण्यास मदत होते.

 

जर तुम्हाला पोटाचा त्रास म्हणजे पोट फुगणे किंवा जड वाटणे असे होत असेल तर आपण लहान वेलचीचे सेवन करायला हवे. याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो .यासाठी तुम्हाला दररोज जेवण केल्यानंतर दोन वेलची चाऊन खायचे आहेत.त्याचबरोबर जेवणानंतर बडीशेप चे सेवन केल्यामुळे या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

पोटदुखी

जर आपण तिखट मसालेदार जेवणाचे सेवन केले किंवा तळलेल्या मिरची घालून बनवलेले जेवण खाल्ले तर आपल्या पोटामध्ये जळजळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास व्हायला सुरुवात होते .त्यामुळे अशा प्रकारच्या जेवणाचे सेवन न करणे हेच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचबरोबर रात्री जेवण केल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतर थोडसं फेरफटका मारणे हे अत्यंत लाभदायक ठरते.

जवसाचे बी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत असे म्हटले जाते . ह्याच्या सेवन केल्याने आपल्या पोटाचा फक्त जडपणा दूर होत नाही तर आपले पोट साफ व्हायला मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यासाठी आपणाला जवसाचे बी सकाळी पाण्यात भिजत घालून रात्री जेवण झाल्यानंतर त्यांचे सेवन करायचे .त्याचबरोबर पोटाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी चहा कॉफी अशा पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हेही वाचा:

अकबर बादशहाच्या एका चुकीमुळे चतुर बिरबलला आपला जीव गमवावा लागला होता.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here