आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

धक्कादायक… गर्भवती महिलांच्या पोटामध्ये आढळून येतेय हि गोष्ट…

आपण सर्वजन आपल्या जन्मदात्या आईला आणि पृथ्वीला जननी म्हणून संबोधतो, परंतु आज आपल्या सर्वांच्या बेजबाबदार वागण्यानेच ह्या दोन्ही संकटात सापडल्या आहेत. पृथ्वीवर प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या हि दिवसेंदिवस वाढत आहे. यासर्वांपेक्षा अधिक चिंताजनक बाब हि आहे कि, आता हे विषारी प्लास्टिक गर्भवती मातांच्या पोटामध्ये आढळून येत आहे.

 

मानवाच्या स्वार्थीपणामुळे पृथ्वीवरील प्रदूषण त्या पातळीवर पोहचले आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मानव दिवसेंदिवस निसर्गासोबत अन्याय करत आहे, याचे काही गंभीर परिणामही मानवाला भूगतावे लागताहेत. आपल्या शास्त्रज्ञांनी कोरोणा सारख्या महामारीवर लस बनवली आहे, परंतु प्लास्टिकच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तेही हतबल झालेले दिसतात.

new google

 

 महिला

 

Enviroment International मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार शास्त्रज्ञांना आता गर्भवती महिलांच्या पोटामध्ये मायक्रो प्लास्टिक आढळून आले आहे. हे मायक्रो प्लास्टिक ५ मिमी पेक्षाही कमी आकाराच्या बारीक कणांच्या रुपामध्ये असते. आजपर्यंत जे प्लास्टिक गंभीर समस्या म्हणून केवळ समुद्र, हवा, पाणी, आणि आपल्या जेवणामध्ये होते तेच आता मातांच्या गर्भापर्यंत पोहचले आहे.

 

या रिसर्चमध्ये ६ महिलांना सामील करण्यात आले होते, त्यापैकी ४ महिलांच्या गर्भ नाळामध्ये नीळा. लाल आणि गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे दाने आढळून आले आहेत. नाळ महिलांच्या शरीरातील तो अंग आहे, ज्यामुळे गर्भावस्थे मध्ये मुलांना ऑक्सिजन आणि दुसरे पोषक घटक मिळतात.

 

रिसर्च करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पेंट, सौंदर्य प्रसादने आणि अन्य काही वस्तूंमुळे हे प्लास्टिकचे कन महिलांच्या गर्भ नाळपर्यंत पोहचले आहेत. नजन्मलेल्या मुलांसाठी आईचे गर्भाशय हेच सर्वात सुरक्षित स्थान असते, परंतु याठिकाणीही प्लास्टिक मिळाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.

 

 महिला

 

शास्त्रज्ञांचा असा अनुमान आहे कि, येणाऱ्या २० वर्षात संपूर्ण जग हे प्लास्टिकच्या समस्येसोबत लढत असेल. दरवर्षी संपूर्ण जगात ३० कोटी टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. हे वजन संपूर्ण जगातील लोकसंखेच्या वजनाएव्हढी आहे.

 

Environmental Science च्या रिसर्चनुसार एका मानवाच्या शरीरामध्ये एका वर्षात ३९ हजार ते ५२ हजार प्लास्टिकचे कण प्रवेश करतात. आज अशी वेळ आली आहे कि, समुद्र, हवा आणि पाण्यासोबत आपल्या शरीरातही प्लास्टिकची भेसळ झाली आहे.

 

२०२० मध्ये कोरोणा महामारीमुळे १५० कोटी मास्क बनवण्यात आले आहेत. त्यापैकी ३ टक्के मास्क हे समुद्रामध्ये फेकल्या जातील असा अंदाज आहे. ज्या मास्काला कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र समजल्या जात होते, त्यांच्यामुळेच आता समुद्राच्या प्रदूषणात वाढ होणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here