आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जगभरात चर्चेचा विषय बनलेला रहस्यमय मोनोलिथ आता अहमदाबादमध्ये दिसून आला आहे! वाचा सविस्तर….

जगातील ३० वेगवेगळ्या देशात आढळून आल्या नंतर आता हा चमत्कारिक मोनोलिथ आता भारतात दाखल झाला आहे. हा मोनोलिथ अहमदाबादच्या थलतेज परिसरातील सिम्फनी पार्कमध्ये आढळला आहे.

मोनोलिथ म्हणजे नेमकं काय?

मोनोलिथ
सर्वात प्रथम आढळून आलेला मोनोलिथ

या आकृतीस मिस्ट्री मोनोलिथ असेही म्हटल्या जाते, मोनोलिथ एक स्टीलच्या खांबासारखी आकृती आहे. ज्याची उंची ६ फुट पेक्षाही जास्तच आहे. या मोनोलिथला जमिनीमध्ये पुरण्याचे कोणतेही निशाण या ठिकाणी दिसत नाहीत हि एक विचित्र गोष्ठ आहे. सर्वात जास्त अचंबित करणारी बाब म्हणजे या मोनोलिथ बद्दल कोणतीही माहिती चक्क पार्कमध्ये काम करणाऱ्या माळ्यालाही नाहीये.

new google

मोनोलिथमागे एलियनचा हात?

त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळी असरामने दिलेल्या माहितीनुसार, जेंव्हा तो सायंकाळी आपल्या घराकडे निघाला होता तेंव्हा पार्कमध्ये अशी कोणतीही वस्तू नव्हती. परंतु  दुसऱ्या दिवशी तो कामासाठी परत आल्यावर पार्कमध्ये हा त्रिकोणी आकाराचा मोनोलिथ आढळून आला आणि त्यानंतर त्याने हि माहिती गार्डन मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली. आतापर्यंत हा मोनोलिथ कुठून ला याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.

मोनोलिथ

 

त्रिकोणी आकार असलेल्या ह्या स्टीलच्या रचनेवर काही संख्या पण लिहिलेल्या आहेत. पार्कला भेट देणारे लोक या खांबाकडे कुतूहलाने पाहत आहेत आणि काहीजण याचे फोटोही घेत आहेत. या मोनोलीथच्या वरच्या दिशेला एक चिन्ह सुद्धा बनवलेले आहे. काही लोक याला एक मिस्ट्री स्टोन म्हणूनही सांगत आहेत.

 

आजपर्यंत असे मोनोलिथ ३० देशांमध्ये बघितल्या गेले आहेत. सर्वप्रथम असाच मोनोलिथ अमेरिकेच्या उटाहमध्ये दिसला होता, आणि त्यानंतर रोमानिया, फ्रांस, पोलैंड, यूके आणि कोलंबिया इथेही असाच रहस्यमय मोनोलिथ आढळला होता. या मोनोलिथ बद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे तर्क आहेत काहीच्या मते तर हे काम एलियनचे आहे.

 

हा पार्क अहमदाबाद मुनिसिपल कोर्पोरेशन आणि सिम्फनी कंपनीने मिळून बनवला आहे. परंतु याठिकाणी हा मोनोलिथ कुठून आला याबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही.

 

याबद्दल गार्डनच्या व्यवस्थापनाकडून अद्यापही कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, या मोनोलिथ बद्दलचे कुतूहल आणखीच वाढावे म्हणून त्यांनी २९ डिसेंबरला काही फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आल्या होत्या.

 

सामान्यतः मोनोलिथ हे उंच मोठ्या आकाराच्या दगडी शीळा असतात ज्यांना काही ठराविक ठिकाणी ठेवल्या जायचे. इतिहासकारांना अशे बरेच दगडी मोनोलिथ मिळाले आहेत, परंतु आता आढळणारे सर्व मोनोलिथ हे चमकदार आणि धातूचे बनलेले आहेत. याशिवाय हे मोनोलिथ आपल्या एका ठीकानावून दुसरीकडे अदृश्य होत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here