आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या कारणामुळे औरंगाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कॉंग्रेस विरोध दर्शवत आहे, जाणून घ्या काय आहे कारण….

 

महाराष्ट्रात काही दिवसांनी नगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्यापूर्वी शिवसेनेला औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या कॉंग्रेस पक्षाने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेसचे म्हणणे आहे कि, निवद्डणुका तोंडावर आल्या असताना भावनिक मुद्द्यांऐवजी विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांना जास्त प्राधान्य देण्यात यावे.

औरंगाबाद

 

औरंगाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाबद्दल कॉंग्रेसचे मत.

कॉंग्रेसच्या या धोरणामुळे अनेक मराठा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावाल्या आहेत, शनिवारी तर काही मराठा कार्यकर्ते कॉंग्रेसच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. और्रंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पुतळे जाळले. एक दिवसापूर्वीच
बाळासाहेब थोरात यांनी घोषणा केली होती कि, त्यांची पार्टी या प्रस्तावाचा विरोध करत आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले,

 

“औरंगाबादचे नाव बदलण्याचा मुद्दा हा नाहाविकास आघाडीच्या कार्यक्रमांचा हिस्सा नाही. अशा गोष्ठींना आम्ही विरोध करत आहोत. कॉंग्रेसला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे, परंतु शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा द्वेष पसरवण्यासाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी वापरला जाऊ नये.”

 

कॉंग्रेसचे वारिष्ठ नेते आणि राज्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही सांगितले कि, शहरांचे नाव बदलने हे महाविकास आघाडी सरकारची प्राथमिकता नाही. हे सरकार तीन पक्षांचे आहे आणि याठिकाणी सर्वांचे मत बिन्न असू शकते म्हणू आम्ही सर्वजन केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी ईकत्र आलो आहोत, यामध्ये नाव बदलण्याला प्राथमिकता देऊ नये असेही ते यावेळी म्हणाले.

 

काल आणखी एका कॉंग्रेसच्या नेत्याने यावर आपली चुप्पी तोडली आहे, संजय निरुपम नाव बदलण्याच्या प्रस्तावाबद्दल म्हणतात, नाव बदलने हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे याठीकानी कोणताही पक्ष त्याचे व्यक्तिगत कामे करू शकत नाही, सर्वांच्या संगनमतानेच कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

औरंगाबाद

 

या सर्व घटनाक्रमावर शिवसेनेची प्रतिक्रीया काय आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये शनिवारी लिहिले होते, कॉंग्रेसने औरंगाबादचे नाव बदलण्यास विरोध केला आहे आणि यामुळे सध्या भाजप खुश आहे. सामनाच्या संपादकीय कॉलममध्ये याबद्दल सविस्तर लेख लिहिला आहे.

 

दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे, जर औरंगजेब रोड हा एपीजे अब्दुल कलाम रोड बनू शकतो, अलाहाबाद हे प्रयागराज होऊ शकते आणि फैजाबाद अयोध्या होऊ शकते तर औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर का होऊ शकत नाही?

 

गेल्या ३० वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालीका हि शीवसेनेच्या हातात आहे, शिवसेनेने १९९५ माध्ये सर्वप्रथम औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. आजपर्यंत राज्यात अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली, परंतु हा मुद्दा जशास तसाच आहे. याबद्दल भाजप जास्त बोलत आहे परंतु त्यांचेही सरकार मागील ५ वर्ष सत्तेत होते परंतु त्यांनीही याबद्दल कोणताच निर्णय घेतला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here