आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लाल मुंग्यांच्या चटनीद्वारे होणार कोरोनाचा उपचार ? वाचा सविस्तर…

 

कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांची चटणी हि कितपत असरदायक आहे, यावर सध्या ओडीसामध्ये खूप चर्चा चालू आहे. आता तर उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि CSIR च्या डायरेक्टर जनरल यांना येणाऱ्या तीन महिन्याच्या आत कोविड १९ च्या उपचारामध्ये लाल मुंग्यांच्या चटणीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

आपल्या देशातील अनेक मागासवर्गीय आणि आदिवशी भागात लाल मुंग्यांची चटणी हि अनेक अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

लाल
लाल मुंग्यांची चटणी

लाल मुंग्यांची चटणी हि हिरव्या मिर्च्यांसोबत बनवली जाते, ओडीसा, छत्तीसगड आणि अनेक राज्यातील आदिवशी हे सर्दी, खोकला, श्वास घेण्यास परेशानी, थकाव यांसारख्या अनेक व्याधींवर उपचार म्हणून हि चटणी खाल्ली जाते.

new google

 

लाल मुंग्यांच्या चटणीवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल.

 

कोरोणा विषाणूवर उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांची चटणी हि किती प्रभावशाली आहे याबद्दल केल्या जाणाऱ्या रिसर्चची निष्क्रियता बघून उच्च न्यायालयात पिटीआय दाखल करण्यात आली आहे. याच पिटीआयवर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ओडीसातील बारीपाडा येथील इंजिनीअर नयाधर पडीयल यांनी हि याचिका दाखल केली होती.

 

लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये असतात रोगप्रतिकारक गुण.

 

लाल
लाल मुंग्या

 

नयाधर पडीयल यांनी २३ जून २०२० ला CSIR अनिई ७ जुलै २०२० ला आयुष मंत्रालयाला आपला प्रस्ताव पाठवला होता. याचिकेमध्ये त्यांनी सांगितले आहे कि, लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये अनेक औषधी गुण असतात.

 

यामध्ये आढळणारे ऐंटी बैक्टीरियल घटक हे पचन संस्थेतील कोणत्याही संक्रमानासोबत लढण्यास मदत करतात. या चटणीत प्रोटीन, कैल्शियम आणि जिंक हे भरपूर प्रमाणात असतात आणि हीच घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवशक असतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here