आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या भारतीय सैनिकाला पाकिस्तानचा आर्मी चीफ बनण्याची ऑफर जिन्नाने दिली होती..!


नौशेरा का शेर या नावाने ओळखल्या जाणारे ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या कबरेची तुटफुट झाली होती, यासंबंधित काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. हि बातमी मिळताच भारतीय सेनेने त्यांची कबर व्यवस्थित केली आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया परिसरात असणाऱ्या मोहम्मद उस्मान यांच्या कबरेच्या सभोवती साफ सफाई करून त्यांच्या रेगीमेंटच्या अधिकाऱ्यांनी फुलांनी कबर सजवली होती.

ब्रिगेडियर

 

new google

भारत पाकिस्तान फाळणीनंतर ब्रिगेडियर उस्मान यांना पाकिस्तानचे आर्मी चीफ बनण्याची ऑफर जिन्ना यांनी दिली होती. देशावर स्वतापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या या देशभक्त सैनिकाने पाकिस्तानकडून मिळालेल्या या आमंत्रणाला ठोकर मारली, आणि काश्मीर मध्ये त्यांच्याच विरोधात उभे राहिले होते.

ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्यावर ५०००० रुपयांचे बक्षीस…

मोहम्मद उस्मान

असेही म्हटले जाते कि, ब्रिगेडियर उस्मान यांनी पाकिस्तान आर्मी ज्वाइन नाही केली म्हणून नाराज झालेल्या जिन्नाने त्यांच्यावर ५०००० रुपयांचे बक्षीस ठेवले होते. परंतु या गोष्ठीचा काहीही परिणाम उस्मान यांच्यावर झाला नाही आणि त्त्यांनी आपली देशसेवा सुरूच ठेवली. त्यांची हिम्मत आणि देशभक्ती पाहून इंडिअन आर्मीने त्यांना जम्मू काश्मीरच्या सीमा संरक्षित करण्याची जबाबदारी दिली होती. याच ठिकाणी ब्रिगेडियर उस्मान यांनी पाकिस्तानी घुसखोरांना अक्षरशः नाकेनऊ आणले होते.

ब्रिगेडियर

 

इंडिअन आर्मीला जशी खबर मिळाली कि, मोहम्मद उस्मान यांची कबर जर्जर झाली आहे, त्यांनी त्याचवेळी डागडुजी करण्यास सुरुवात केली होती. संगमरवरी दगडाने बनवलेल्या या समाधीवर चमकदार शब्दात लिहिले आहे, “ब्रिगेडियर एम. उस्मान, एमवीसी, नौशेरा का शेर”

ब्रिगेडियर उस्मान हे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या युद्धात ३ जुलै १९४८ रोजी शहीद झाले होत, त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे देशासाठी अर्पण केले. भारत मातेच्या या वीर पुत्राच्या अंतिमयात्रेत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोबत अनेक राजनेता सामील झाले होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here