आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इंटरनेट आणि मोबाईल Apps च्या मदतीने भारतीय तरुणांना दहशदवादी आपल्या जाळ्यात ओढत आहेत.!

 

भारतीय सेनेने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानमधील दहशदवादी संघटना काश्मीरमध्ये त्यांच्या ठाराविक योजनांना राबवण्यास अपयशी होत आहेत. भारतीय सेनेने या संघटनांच्या मुळावरच वार केला आहे, यामुळे त्यांना नवीन दहशतवादी भरती करणे कठीण झाले आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी मिळून यावर एक तोडग काढला आहे. हे लोक आता इंटरनेट आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे भारतीय तरुणांची भरती दहशदवादी संघटनांमध्ये करीत आहेत.

new google

दहशदवादी

 

बनावट व्हिडिओ दाखवून तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न.

आयबी च्या एका रिपोर्टनुसार, भारतीय सेनेच्या कठोरपणामुळे दहशतवादी संघटनांना आता तरुणांची भरती करणे कठीण झाले आहे, म्हणूनच आता ते तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. भारतीय तरुणांना भडकवण्यासाठी पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर त्यांना बनावट व्हिडिओ दाखवत आहेत. त्यांना या व्हिडिओंद्वारे सांगितले जात आहे की, भारतीय सेना त्यांच्या परिसरातील लोकांवर अतिशय क्रूरतेने अत्याचार करत आहे.

 

आजपर्यंत हे दहशदवादी तरुणांना स्वतः संपर्क करायचे, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी पहारा कडक केल्यापासून त्यांना असे करणे शक्य राहिले नाही. यावर पर्याय म्हणून त्यांनी आता नवीन भरती करण्याची पद्धत बदलली आहे. आयएसआय आणि दहशतवादी संघटना आता तरुणांना ऑनलाइन भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी सुरक्षा संस्थांकडून २० हून अधिक दहशतवादी मोड्यूल्सचा भंडाफोड करण्यात आला आणि ३० हून अधिक दहशतवादी समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

 

दहशदवादी

 

भारतीय सेनेपुढे आत्मसमर्पण केलेल्या दोन दहशतवाद्यांनी सांगितले की, त्यांना दोघांनाही यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांची भेट हि केवळ एकदाच त्यांच्या चीफ सोबत झाली होती. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा एजन्सींनी काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी एजन्सी आयएसआयच्या स्लीपर सेल्सचा भांडाफोड केला आहे.

 

भारतीय सैन्याच्या कडकपणामुळे दहशतवादी संघटना दारूगोळ्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. यामुळेच पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे चीफ आता जास्तीत जास्त शस्त्रे भारतात पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात रोखण्यात सैन्याला यश आले आहे. आतापर्यंत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या व्यतिरिक्त दहशतवाद्यांना आर्थिक मदत व समर्थन देणारे सार्वजन हे भरतीय सैन्याच्या रडारवर आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here