आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

निरोगी केसांसाठी ह्या ६ प्रकारच्या तेलाचा वापर करावा!

 

प्रतेक व्यक्तीला लांब, काळे आणि दाट केस हे फार आवडतात, सुंदर केसांमुळे सुंदरता हि अधिकच खुलून दिसते. परंतु बदलत्या वातावरणात वेळेअभावी आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे पडतात.

 

new google

व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते तुटतात आणि गळून पडतात. ज्या प्रकारे आपल्या शरीराला पोषक घटकांची आवशकता असते त्याच प्रमाणे केसांनाही पोषणाची गरज भासते.

 

केसांची काळजी घ्यायची असेल तर सर्वात जास्त आवशकता आहे हेअर आईल ची अर्थातच तेलाची. आज अशाच केसांसाठी फायदेमंद असणाऱ्या ६ प्रकारच्या तेलांबद्दल  सांगणार आहोत. वाचा सविस्तर…

 

तेल

 

 

नारळाचे तेल (coconut oil)

नारळ तेलात आपल्या केसांना पोषण देणारी व्हिटॅमिन आणि पोषक तत्त्वे भरपूर असतात. यामुळे केस वाढतात, दाट आणि निरोगी राहतात. नारळ तेल जगातील सर्वोत्तम नैसर्गिक कंडीशनर आहे. या तेलाच्या मालिशमुळे रक्त परिसंचरण वाढते तसेच तणाव आणि डोकेदुखी दूर होते.

 

बदाम तेल (almond oil)

बादाम तेलामध्ये बद्दमात आढळणारे सर्वच पोषक घटक असतात. आपणास जर केसांसंबंधित समस्या असेल जासी कि, केस गळणे, तुटणे किंवा खराब होणे. यासाठी बदाम तेल एक औषध म्हणून कार्य करते कारण त्यामध्ये केसांना पोषण देणारी सर्व पौष्टिकता असते. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे पोषणबरोबरच केसांच्या वाढीस मदत करते.
बदाम तेलाच्या वापरणे केस चमकदार तसेच रेशमी बनतात.

 

ओलिव्ह तेल. (olive oil)

जैतूनचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल हे किंबहुना सावांच्याच परिचयाचे असेल. हे तेल ऑलिव्ह फळापासून बनवले जाते,हे तेल कोरड्या केसांवर अतिशय चांगला उपाय आहे. ऑलिव्ह ऑईलने मालिश केल्यास केस गळणे कमी होते आणि नवीन केसही येऊ लागतात. या तेलाने मालिश केल्यास केसांची वाढ अतिशय जलद हिते. उन्हाळ्यामध्ये या तेलाचा वापर हा कमीच करावा.

 

तेल

एवाकाडो तेल (Avocado oil)

एवाकाडो तेलात असलेले व्हिटॅमिन खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स केसांना तुटण्यापासून वाचवतात तसेच त्यांना चमकदार बनवतात. यासोबतच केसांमध्ये झालेला गुंतागुत दूर करण्यासाठी एवाकाडो तेल उपायोगी पडते. केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासही हे तेल महत्वाचे आहे. स्मिमिंग करणाऱ्या व्यक्तीच्या केसांना क्लोरिनचा थर जमा होतो. यापासून बचाव करण्यासाठी एवाकाडो तेल उपयुक्त आहे. केसात कोंडा झाल्यास त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे तेल फायदेमंद ठरते.

 

एरंडी तेल (caster oil)

एरंडेल तेल केसांसाठी एक निरोगी तेल आहे, यामध्ये ओमेगा 6 असलेले रिझिनोइक अॅसिड असते जे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवून केसांना मजबूत करते तसेच केसांना पोषण देते. एरंडेल तेल हे अन्य खूप कामासाठी वापरले जाते.

 

चंदन तेल ( sandal oil )

या तेलामध्ये दाहक-विरोधी घटक असतात जे केसांचा कोरडेपणा दूर करतात आणि टाळूला कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून वाचवतात.( चंदन तेल हे केसांवर जास्त लाऊ नये, थोडीसी मात्रा केवळ आंघोळ करण्याआधी लावावी आणि नंतर धुवून टाकावे.) चंदन तेल हे केसांच्या प्रतीक समस्येला दूर करण्यासाठी उपयोगी नैसर्गिक तेल आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here