आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कोरोणानंतर आता बर्ड फ्लूचे नवीन संकट.!

 

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि भीती नेमकीच लोकांच्या मनातून कमी झाली होती, आणि आता देशावर नवीन संकट ओढावले आहे. हे संकट आहे बर्ड फ्लू या रोगाचे. यापासून सतर्कता बाळगण्याचा इशारा अनेक राज्यांना देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रावर अद्याप हे संकट ओढवले नाही, परंतु हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश राजस्थान केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये घोषित केलेला हाय अलर्ट बघून आपण सुद्धा सावधगिरी बाळगायला हवी. या राज्यांमध्ये चिकन अंडी विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

बर्ड फ्लू

 

पशुपालन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५०० च्या आसपास पक्षांचा म्रृत्यू झाला आहे, यामध्ये कावळे, बगळे आणि कोंबड्या होत्या. राजस्थान येथील झालावाड जिल्ह्यातील काही पक्षांचे नमुने हे परीक्षणासाठी भोपाळच्या पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते.

 

या नमुन्यांचा अहवाल आला असताना सर्वांना धक्काच ब्बसाला कारण यात ९० टक्के पक्षांना बर्ड फ्लू ची लागण झाली होती. यानंतर अनेक जिल्यातील पक्षांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यांचा अहवाल अजून यायचा आहे.

 

हिमाचल प्रदेशातील कांडगा जिल्ह्यात असललेल्या पोंग तलावामध्ये काही दिवसांपूर्वी अनेक पक्षी तरंगताना आढळून आले होते. या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुळे याठिकाणी पण हे संकट वाढण्याची शक्यता आहे.

बर्ड फ्लू

 

बर्ड फ्लू मुळे केरळमधील ४०००० पक्षांना मारणार?

केराल राज्यात अलपुझ्झा आणि कोट्टायम येथे या विषाणूचा प्रसार झाला आहे आणि यामुळेच या प्र्राभावित्त क्षेत्रातील सर्व पक्षांना मारण्याचे आदेश राज्य सरकारने द्दिले आहेत. याठिकाणी बर्ड फ्लू च्या भीतीने जवळपास ४०००० पक्षांना मारावे लागणार आहे.

 

हिमाचल प्रदेशमध्ये स्थानिक प्रशासनाकडून कोंबडी, बदक, आणि मासे यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. बर्ड फ्लूचा धोका बघून अन्य काही राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतू महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूच्या संसर्गाची एकहि घटना उघडकीस आली नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here