आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

नवाब पटौदी आणि शर्मिला टागोर यांची ‘लव स्टोरी’…..

भारतीय क्रिकेटला कर्णधारांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे, या महान कर्णधारांपैकी एकक म्हणजे नवाब मंसूर आली खान पटौदी. नवाब पटौदी कर्णधार असताना घडलेले किस्से हे आजही सांगितल्या जातात. ५ जानेवारी १९४१ रोजी भोपाळच्या नवाब घराण्यात जन्मलेल्या नवाब मंसूर आली खान पटौदी यांनी क्रिकेटही नवाबी शैलीमध्ये खेळला आहे.

 

नवाब पटौदी
नवाब पटौदी

 

new google

नवाब मंसूर आली खान पटौदी यांचे संपूर्ण जीवन हे एखाद्या चित्रपटासारखे राहिले आहे. त्या काळची बहुचर्चित अभिनेत्री शर्मिला टागोर सोबत केलेल्या इश्कबाजी मुळे ते सर्वत्र  प्रसिध्द झाले होते, सर्वत्र त्यांचीच चर्चा राहत होती. आज जाणून घेऊया त्यांच्या लव स्टोरीशी संबंधित काही घटना….

 

भारतीय क्रिकेटमध्ये टायगर म्हणून प्रसिध्द असलेल्या नवाब नवाब मंसूर आली खान पटौदी यांचा आज जन्मदिवस आहे. आज ते आपल्या सर्वांसोबत नसले तरीही त्यांच्या कप्तानीच्या आणि जीवनातील अनेक घटना प्रसिध्द आहेत.

 

जुलै १९६१ मध्ये नवाब c पटौदी यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती आणि त्यांचा हा डोळा निकामी झाला होता, असे असतानाही त्यांनी आपल्या जीवनात हार मानली नाही. या घटनेच्या ६ महिन्यानंतरच त्यांनी इंग्लंडविरोधात कसोटी क्रिकेटची सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनले होते.

 

नवाब पटौदी
नवाब पटौदी

 

नवाब मंसूर आली खान पटौदी यांचे क्रिकेट करिअर जितके रोमांचक होते, तितकीच शर्मिला टागोर सोबत असलेली त्यांची व स्टोरी पण होती. शर्मिला टागोर यांनी नवाब पटौदी यांना चार वर्ष आपल्या मागे फिरवले होते. नवाब पटौदी त्यांच्या एका स्माईल साठी त्यांच्या मागेमागे फिरायचे. या दोघांची पहिली भेट हि १९९५ मध्ये झाली होती. यांच्या एका मित्राकडून त्यांची भेट झाली होती.

 

पहिल्याच भेटीत नवाब पटौदी यांना शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम झाले होते. शर्मिला यांच्याशी ओळख वाढवण्यासाठी आणि इम्प्रेस करण्यासाठी नवाब पटौदी यांनी एक फ्रीज गिफ्ट दिला होता. या घटनेनंतर त्यांची फोनवर बोलणे सुरु झाले. परंतु शर्मिला यांना राजी करणे एव्हढे सोपे काम नव्हते, गुलाबाचे कित्तेक गुलदस्ते आणि कित्तेक पत्र लिहील्यानंतरच त्यांनी होकार दिला होता. १९६५ पासून १९६९ पर्यंत नवाब पटौदी यांनी शार्मिलाला राजी करण्यासाठी कित्तेक गिफ्ट दिले होते.

 

नवाब मंसूर आली खान पटौदी यांनी शर्मिला टागोर यांना पॅरीस मध्ये प्रपोज केले होते, शर्मिलाने त्यांचे प्रपोजल मान्य तर केले होते परंतु लग्नासाठी एक आत ठेवली होती. ती अट म्हणजे, जर नवाब पटौदी येणाऱ्या सामन्यात लगातार ३ षटकार मारतील तरच त्या लग्न करतील, आणि नवाब पटौदी यांनी लगातार ३ षटकार मारले होते.

 

नवाब पटौदी
नवाब पटौदी

 

असेही म्हटल्या जाते कि नवाब पटौदी हे शर्मिला टागोर यांचे मैदानात स्वागत षटकार मारून करायचे. शर्मीलाजी ज्या दिशेला बसायच्या त्याच दिशेला नवाब पटौदी हे षटकार मारत असत.

 

शर्मिला टागोर ह्या बंगाली हिंदू कुटुंबातून होत्या तर नवाब मंसूर आली खान पटौदी ही नवाबांच्या घराण्यातील होते. दोन्ही परिवार एक दुसऱ्या पासून वेगळे होते, असे असूनही त्या दोघांनीही आपल्या परिवारास राजी केले होते.

 

२७ डिसेंबर १९६९ रोजी ह्या दोघांचाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला होता. जीवनातील ४२ वर्ष एकमेकासोबत राहिल्यानंतर २०११ मध्ये नवाब मंसूर आली खान पटौदी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या जीवनातील रोमांचाक घटना ह्या सद्दैव स्मरणात रहातील अशाच आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here