आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

ऍसिडिटी होण्याची हि मुख्य कारणे तुम्हाला माहित असायला हवी…..

 

ऍसिडिटी म्हणजे रिफ्लेक्स होणे. आपण जे अन्न खातो ते बऱ्याच वेळा वाटते की पूर्ण घशापर्यंत येत आहे आणि जळजळ सुरू होते तसेच करपट ढेकर येणे, यालाच ऍसिडिटी म्हटले जाते. ऍसिडिटी चे कारण आहे बॅक्टेरिया इस फ्लोरिंग ते आपल्या छाती मध्ये राहते व जास्तीत जास्त ऍसिडिटी करण्याचा प्रयत्न करते.

ऍसिडिटी

new google

 

ह्या बॅक्टेरिया चा काहीतरी उपाय केला पाहिजे, मग तो डॉक्टरांची ट्रीटमेन्ट असो. हा बॅक्टेरिया ऍसिडिटी पण करतो तसेच आतड्यावरील सूज पण ह्या बॅक्टेरिया मुळे येते. अल्सर होतो व कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता असते.

 

पहिले महत्वाचे कारण आहे बॅक्टेरिया . दुसरे कारण ते म्हणजे स्मोकिंग . बऱ्याच वेळा तंबाखू ,गुटका, पान, मसाला असलेले जेवण करणे व तसेच अल्कोहोल असलेल्या गोष्टी घेणे. त्यामुळे ऍसिडिटी होते.

 

चहा व कॉफी यामुळे जास्त प्रमाणात ऍसिडिटी होते कारण चहा व कॉफी आपण रिकाम्या पोटी जास्त करून सकाळी घेतो. चहा व कॉफी मध्ये एसीडीसी सिक्रेशन करण्याची जास्त प्रमाणात क्षमता असते. त्यामुळे चहा व कॉफी खूप कमी प्रमाणात घ्यावा.

 

गरोदर बायकांना ना जास्त ऍसिडिटी होते, कारण बाळ तयार होते त्यामुळ जास्त प्रेशर देत असते. ह्या कारणास्त्रव हार्मोन्स तयार होतात व ते ऍसिडिटी चे प्रमाण वाढवतात.

 

कार्बनडाय-ऑक्साइड असणारे पेय किंवा सोडा उदाहरणार्थ -पेप्सी, थम्स अप, स्प्राईट इत्यादी हे पेय ऍसिडिटी प्रमोट करतात पण आपल्याला माहीतच नाही की, आपल्याला आराम मिळत नाही उलट जास्तच ॲसिडिटी वाढते.

 

ऍसिडिटी

 

मसाल्याचे पदार्थ मग ते कोणतेही भाजी मध्ये असो ऍसिडिटी होते. तसेच खारट, आंबट खाल्ल्याने ऍसिडिटी होते. तसेच तिखट हिरवी मिरची मुळे जास्त प्रमाणात ऍसिडिटी होते.

 

टोमॅटो सॉस किंवा कोणताही सूप घेतला की ऍसिडिटी प्रमोट होते. आपल्याला वाटते की आपली भूक वाढली आहे, तसेच नाष्टामध्ये समोसा, वडापाव, भजी ह्यामुळे जास्त प्रमाणात ऍसिडिटी होते.

 

तसेच कोणतेही तळलेले पदार्थ ऍसिडिटी होण्याचे एकमेव कारण आहे. हरभरा डाळ , बेसन लाडू, बेसन म्हणजे एकंदरीत चण्याच्या डाळीचा पदार्थ किंवा भजी खाल्ल्याने जास्तच ऍसिडिटी होते . तसेच पोट गॅस ही पकडते.

 

चिकन नॉनव्हेज अशा पदार्थांमध्ये आपण जास्त मसाला घालतो, तेल घालतो या ही गोष्ट मुळे आपल्याला ऍसिडिटी होते. तसेच स्नॅक सेंटर म्हणजेच मंचूरियन नूडल्स हे खाल्ल्याने ऍसिडिटी होते.

 

ऍसिडिटी

 

बरच काही आपल्या दैनिक कार्यक्रमावर वर सुद्धा अवलंबून आहे. मानसिक त्रास, शारीरिक त्रास, झोप न लागणे, रात्री उशिरा झोपणे किंवा झोपेची वेळ फिक्स नसणे ह्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते.

 

कधीकधी जास्त खाल्ल्यामुळे किंवा खूप कमी खाल्यामुळे ऍसिडिटी होते. म्ह्णून म्हणतात की थोड-थोड खावा पण सारखे खा कारण आपण पोट भरून जेवतो आणि लगेच झोपतो. यामुळे ऍसिडिटी जास्त प्रमाणात होते.

 

तसेच आपण अंगदुखी च्या गोळ्या खातो किंवा डॉक्टरचा सल्ला न घेता खातो त्यामुळेही ऍसिडिटी होते. या सर्व कारणांमुळे ऍसिडिटी होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here