आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपणास माहित आहे का ? की आपण एक टी-बॅग पाण्यामध्ये टाकतो तेंव्हा त्याच्यासोबत जवळपास 11.6 मायक्रोप्लास्टिक कण आणि 3.1 अब्ज नॅनो प्लास्टिक पण पाण्यामध्ये सोडले जातात. कॅनडाच्या एका मॅकगिल युनिव्हर्सिटी च्या अभ्यासानुसार असे स्पष्ट झाले आहे की ती बॅग आपल्या आरोग्यासाठी हवी तेवढी सुरक्षित नाही, जितके आपण तिला समजतो.

 

टी-बॅगचा वापर करणे अप्रत्यक्षरीत्या आपल्या आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टीसाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण तिचा कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापर केला तर तिच्यामधून हानिकारक घटक झाडांना मिळतील.

 

new google

टी बॅगच्या या समस्या लक्षात घेऊन आसामची एक चहा कंपनि ‘द टी लिफ्ट थयोरी’ ने एक अशा प्रकारे चहाचे पॅकिंग केली आहे की जे पर्यावरण स्नेही आहे. एक खास पॅकिंग ला त्यांनी ” वूलाह ” या नावाच्या अंतर्गत सुरू केले आहे. या टी बॅग मध्ये दोन चहा पानांचा दाब देऊन गुठ्ठा बनवलेला आहे आणि त्यांना सिलेंडर सारखा आकार देण्यात आला आहे. या बॅग ची पॅकिंग नैसर्गिकरित्या उगवलेल्या धाग्यापासून बांधले गेले आहे. त्याचे वजन फक्त दोन ग्रॅम इतके आहे.

 

टी-बॅग

 

कंपनीचा हा प्रॉडक्ट दिसायला कोणत्याही दुसऱ्या टी बॅग सारखाच आहे परंतु त्याची गुणवत्ता आणि चव त्याला इतर दुसऱ्या प्रोडक्ट पासून एकदम वेगळा बनवून ठेवतो. चहाच्या पानांना कोणत्याही प्रकारे न तोडता त्यांच पॅकिंग करण्यासाठी वापर केला गेला आहे आणि त्यामुळे चहाला येणारी कडू चव कमी होते आणि आपणाला एकदम ताजा आणि चवदार चहा मिळतो.

 

‘द टी लिफ्ट थयोरी’ कंपनीचे संस्थापक उपामण्यू बोरकाकोटी सांगतात की त्यांनी ही कंपनी आपले लहानपणीचे दोस्त अंशुमन भरली यांच्यासोबत 2016 मध्ये सुरू केली होती कारण त्यांना आसाम दार्जिलिंग आणि मेघालय या राज्यांच्या गरीब शेतकऱ्यांना मदत करता येईल. हा एक b2b प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चहा खरेदी करतात आणि त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये नेऊन पोचवतात.

 

चहाच्या पानांचा विशिष्ट स्वाद.

वूलाह ब्रँड नाव हे एका आसामी भाषेतून आले आहे. याचा अर्थ होतो आनंद. हे ब्रँड नाव गेल्या काही महिन्यांमध्ये स्थापन करण्यात आले आहे आणि सध्या हे आसाम मधील चहा परंपरेला एक वेगळ्या प्राकृतिक आणि त्याचबरोबर आरोग्यदायक दर्जा म्हणून ओळख निर्माण करत आहे.

 

टी-बॅग

 

वूलाह ब्रँड टी बॅग थेट ग्राहकापर्यंत पोहोचवले जातात.चहाचा व्यापारामध्ये जवळपास तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर कंपनीच्या दोन्ही संस्थापकांनी हा निर्णय घेतला की ते हस्तव्यवसाय प्रसिद्ध असणारा त्याचा चहाचा प्रॉडक्ट शोधून काढायचा. त्यांनी त्यांच्या कंपनीचे गुंतवणूक या गोष्टीमध्ये केली आणि शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

चहाच्या पानांना तोडल्यानंतर त्यांना एकावर एक ठेवून दाब दिला जातो कारण त्याची पॅकिंग करत असताना अस्ताव्यस्त होऊ नयेत. त्या सर्व पानांना एका विशिष्ट आकारांमध्ये बांधले जाते आणि त्याचे वजन दोन ग्रॅम इतके असते. हे काम खूप कौशल्याची आहे आणि त्यासाठी जवळपास 40 महिलांना पॅकेजिंग साठी रोजगार मिळत आहे.

 

एकदा की चहाची टी बॅग ग्राहकापर्यंत पोहोचली की त्यांना फक्त त्या चहाच्या पॅकिंग केलेल्या पानांना गरम पाण्यामध्ये सोडायचे आहे . दाब देऊन पॅकिंग केलेली चहाची पाने पाच मिनिटांमध्ये फुलून जातात . चहाच्या चवीच्या आधारावर एकच पॅकिंग ला आपण जवळपास दोन किंवा तीन वेळा वापर करू शकतो.

 

कंपनीची सुरुवात कशी झाली.

टी-बॅग

 

कंपनीचे संस्थापक उपामण्यू आणि त्यांचे मित्र अंशुमान हे आसामच्या शिवसागर शहरात लहानाचे मोठे झाले आणि त्यांचे शिक्षणही तेथेच झाले . सन 2010 मध्ये ते नोकरीसाठी दिल्ली येथे गेले. मार्केटिंग मध्ये चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर दोघे मित्र अंशुमन पारंपरिक चष्म्याचा व्यवसाय करण्यासाठी परत आले.

 

या व्यवसायमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की अपर्याप्त निर्मितीमुळे व्यवसाय पुढे जाऊ शकत नाही . याच गोष्टीचा विचार करून त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला.

 

आसाम जगातील सर्वात जास्त चहाचे उत्पादन घेणारे राज्य आहे. त्यांना या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की त्यांचा हा चहाचा व्यवसाय कधीही तोट्यात जाणार नाही. त्यांनी येथील लहान-मोठ्या शेतकऱ्यांची बोलणी केली त्यांच्या असे लक्षात आले की नैसर्गिक रित्या बनवलेला चहा थेट ग्राहकापर्यंत पोचला जाऊ शकत नाही .तेव्हा त्यानि थेट ग्राहकापर्यंत आहे तसाच चहा पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आणि ते यात यशस्वी झाले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here