आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वतःला लाऊन घ्या ह्या सवयी…

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आणि इतर सर्व गोष्टीतील प्रगतीमुळे माणसाचे प्रत्येक गोष्टीत एक कष्ट कमी झाले आहे. माणूस प्रत्येक वेळी आपले कार्य कमी कष्ट मध्ये कसे होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त आराम कसा भेटेल हेच पाहत असतो . कधीकधी आपला हा अति आळशीपणा किंवा शरीराला व्यायाम न देण्याच्या सवय आपल्याला घातक ठरू शकतात.
सध्या कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी देशभरामध्ये अथक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या रोगामुळे सर्व लोक आता आपली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी याबाबत आता जागरूक झाले आहेत. आपल्याला आजार पासून दूर राहत असेल तर काही गोष्टी केल्या पाहिजेत तर काही गोष्टीं टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागणार नाही आणि आपण आपल्या कुटुंबाससह निरोगी राहील…!

आजार
आजार

◆अशी असावी दिवसाची सुरुवात…

आपण आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारे करतो हे आपल्याला निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण दिवसातून कमीत कमी दोन फळांचे सेवन नक्कीच करायला पाहिजे . आपल्या जेवण्याच्या वेळेमध्ये योग्य बदल आपल्याला घडवून आणायला हवेत. रात्री नऊच्या आधी जेवणाचा प्रयत्न करा. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवण केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास चालण्याची सवय ठेवा.

new google

◆दिवसभरात घेतला जाणारा आहार
आपण कोणत्या आहाराचे सेवन करतो यावर आपले आरोग्य अधिक अवलंबून असते. आपल्या सकाळच्या नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची योग्य नियमावली तयार करायला हवी. दुपारच्या जेवणासाठी तुम्ही जड आहाराचे सेवन करू शकता परंतु रात्रीच्या वेळी सहज पचतील अशा हलक्या आहाराचे सेवन करा. शरीराला उत्साही ताजेतवाने आणि पूरक असणारी प्रथिने कॅल्शियम आणि फायबर या सर्व गोष्टी पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश असणे गरजेचे आहे..

 

◆ पोस्टीक पदार्थांचे सेवन
ताज्या आणि हंगामी उपलब्ध असणारी फळे पालेभाज्या आणि इतर गोष्टी आवर्जून खायला पाहिजेत. घरी शिजवलेले अन्न हे सर्वात जास्त पौष्टिक असते. बाहेरचे खाणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर तेलकट तरतरीत चमचमीत असे पदार्थ खाणे टाळावे. त्या गोष्टी तंतोतंत पाळल्या तर तुम्ही सर्व भयंकर आजारापासून दूर राहू शकता. हिरव्या भाज्या ऑंटी एक्सीडेंट ,पोषक जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात .त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते.

◆पूरक झोप.…

निरोगी राहण्यासाठी आणि आपले दिवसभराचे नियोजित काम पूर्ण करण्यासाठी योग्य झोप घेणे अत्यंत गरजेचे असते. झोप पुरेशी नाही झाली तर कामामध्ये लक्ष लागत नाही. त्याच बरोबर आळस येणे चिडचिड होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सहा ते आठ तास झोप पुरेशी ठरते .आपल्या आवडीनुसार चांगली पुस्तके वाचणे संगीत ऐकणे आणि आवडत्या ठिकाणांना भेटी देणे याही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवन आनंद ठेवण्यास खूप महत्त्वपूर्ण ठरतात.

◆ पाण्याचे भरपूर सेवन….
निरोगी जीवन जगायचे असेल तर त्यामध्ये पाण्याचा सर्वात मोठा भाग आहे .एका मेडिकल अहवालानुसार एका माणसाने दररोज सुमारे ७.७ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाणी आपल्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याबरोबरच शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते.

◆व्यायामाची सवय…
दररोज व्यायाम करण्याची सवय लावणे फायद्याचे आहे. व्यायाम करण्यासाठी जिम किंवा फिटनेस सेंटर मध्ये जाणे गरजेचे नाही. घरी बसून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम

असे म्हटले जातो की माणसाचे विचार आणि त्याचं वागणं हे त्याच्या सोबत राहणाऱ्या पाच ते सहा लोकांचे दर्शन असते. चांगले विचार असणारे आणि आपल्या तंदुरुस्ती बाब अत्यंत गंभीर असणाऱ्या लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: बाबरीखाली राम मंदिर आहे असा शोध या मुस्लीम व्यक्तीने लावला होता. वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here