आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जेवण केल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान होऊ शकतात 4 मोठ्या समस्या !


आपल्यातले बरेच जणांना जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. परंतु आपण याचा कधी विचार करत नाही की जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे ही सवय आपल्या नुकसानकारक ठरू शकते . जेवण केल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासानंतर आपण पाण्याचे सेवन करायला हवे. जेवल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन केल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो . तर आज आपण याबाबत थोडसं खोलवर जाणून घेणार आहोत.

पाणी

१.पचनक्रिया मध्ये बाधा निर्माण होणे..

new google

आपण जेवण केल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन केल्यामुळे पचन संस्थेच्या विविध समस्यांचा धोका निर्माण होतो.आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने पाण्याचे सेवन करावे.

२.वजन वाढण्याचा धोका…

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन केले तर त्याचा परिणाम आपल्या वजनावर होऊ शकतो. आपले वजन जास्त प्रमाणात वाढण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरू शकते. त्यावर उपाय म्हणून आपण जेवणाच्या अगोदरच दोन तास पाणी प्यायला हवे.

३.अल्सर होण्याची शक्यता..

आपणालाही जाणवले असेल की जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे आपल्या पोटामध्ये गॅस पकडणे किंवा आम्लाचे प्रमाण जास्त होणे अशा समस्याचा त्रास होतो. जेवणानंतर लगेच पाणी पिल्यामुळे आपल्याला अल्सर होण्याची शक्यता असते. आपण जेवण केल्यानंतर आपले अन्न बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठरात जाऊन त्याचे पचन होते. आपण लगेच पाणी प्यायलाने जेवण पचण्यास आणि जत्रा चे काम व्यवस्थेचा होण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकतो. त आयुर्वेदामध्ये ही जेवन आणि पाणी यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

 

४. मधुमेह….

ज्या लोकांना डायबिटीज किंवा मधुमेह आहे अशा लोकांसाठी जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिणे धोकादायक ठरू शकते कारण रक्तातील साखरेचे प्रमाण लगेच पाणी पिल्याने वाढते.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे जेवण पचत नाही. अंगामध्ये थकवा निर्माण होतो, शरीरामध्ये आळस असल्याचा भास होतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास व्हायला सुरुवात होते. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी यायला हवे आणि जेवण केल्यानंतर ताबडतोब पाणी न पिणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मार्ग आहे. यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

पाणी

◆ पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर कमीतकमी दोन ग्लास पाणी घ्या.

जेवण करण्याच्या आधी एक तास पाणी प्या. त्याची मदत आपल्याला जेवण पचन मध्ये होते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जेवण केल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने पाण्याचे सेवन करा.
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या आधी आणि नंतर भरपूर पाण्याचे सेवन करा. असे केल्याने डीहायड्रेशन ची समस्या होणार नाही.

आपले शरीर आरोग्यदायी आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

शरीराला हवे इतक्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपले विचार करण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत मिळते, त्याचबरोबर योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला हवी तितकी ऊर्जाही मिळते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: बाबरीखाली राम मंदिर आहे असा शोध या मुस्लीम व्यक्तीने लावला होता. वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here