आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

रात्री लवकर झोप येत नसेल तर करा हे घरगुती उपाय…!

आपल्या वेगवेगळ्या सवयीमुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला बऱ्याच वेळ लवकर झोप येत नाही. त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीला रात्री उशिरापर्यंत जागायची सवय झालेलि आहे. जर आपली झोप व्यवस्थित नाही झाली तर आपला दुसरा दिवसही अस्वस्थ जातो.

पुरेशी झोप न घेतल्याने दुसऱ्या दिवशी आपली चिडचिड होते, कामामध्ये लक्ष लागत नाही ,सारखा आळस येणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

झोप

new google

आपल्यातील काहीजण खूप कमी झोप घेतात. कमी झोप घेतल्याने आपल्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. इंसोंमिया हा आजार झोप कमी घेतल्यामुळे होण्याची शक्यता असते.
आपल्या शरीराला योग्य आणि पुरेशा झोपेची गरज असणे गरजेचे असते. काही लोकांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. तर आज आपण या विषयावरती एकदम सोपे आणि परिणामकारक उपाय जाणून घेणार आहोत.

१. झोपण्याच्या ठिकाणचे तापमान.

आपले शरीर झोपताना थंड आणि सकाळी उठल्यावर गरम असते. आपण जर झोपताना थंडगार वारा असेल किंवा थंड वातावरण असेल तर अशा ठिकाणी झोप लवकर लागते. जर झोपण्याच्या जागेचे ठिकाणी उष्ण असेल तर काहीवेळा आपणाला झोपच येत नाही. झोप लागण्यासाठी सांगितल्याप्रमाणे थंड वारा असणारे किंवा थंड वातावरण असेल अशी व्यवस्था करा.

२.पायांच्या तळव्यांची काळजी

व्यवस्थित आणि लगेच झोप येण्यासाठी पायांच्या तळव्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे .जर आपल्या पायाचे तळवे थंड असतील तर आपल्याला झोप येत नाही. आपले सारखे लक्ष त्याकडे जाते आणि आपली झोप निघून जाते. त्यामुळे झोपताना पायांच्या तळव्यांवर ब्लॅंकेट किंवा चादर घेऊन झोपा म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागेल.

३.अंधारात झोपायची सवय.

नेहमी झोपताना लाईट बंद करून झोपायची सवय लावा. तुम्हाला जर पुरेशी झोप घ्यायची असेल तर तुम्हाला अंधाराची मैत्री करावी लागेल. आपला ना दिवसभर प्रकाशातून योग्य हवा आणि प्रकाश मिळतो त्यामुळे आपल्याला अंधारामध्ये लवकर झोप येते.

झोप

४.झोपेतून उठल्यावर मोबाईल किंवा घड्याळ पाहणे टाळावे.

रात्री आपण काही कारणास्तव म्हणजेच काहीजण लघवीसाठी तर काही जण पाणी पिण्यासाठी उठतात. त्यावेळी काही लोकांना मोबाईल किंवा घड्याळ पाहण्याची सवय झालेली असते. असे करणे आपल्या झोपेसाठी अयोग्य आहे . याचा परिणाम असा होतो की आपल्या डोळ्यावरील झोप उडून जाते आणि नंतर आपल्याला खूप वेळ झोपच येत नाही . त्यामुळे हे गोष्ट करणे प्रत्येकाने कटाक्षाने टाळावे.

५.झोपण्याची पद्धत.

जर तुम्ही एकाच पद्धतीने झोपत असाल आणि तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपायची पद्धत बदलायला हवी. ज्या पद्धतीने झोपल्यावर ती तुम्हाला लगेच झोप येते ही गोष्ट तुम्ही स्वतः ओळखायला हवी .त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेली उशी सुद्धा बदलून पहा.

६.झोपण्याआधी कॉफी पिण्याचे टाळणे.

तुम्ही झोपण्याच्या आधी कमीत कमी सहा तास कॉफी न पिणे हे तुमच्यासाठी योग्य आहे. कॉफी मध्ये असेलेल्या घटकामुळे आपली झोप नाहीशी होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: बाबरीखाली राम मंदिर आहे असा शोध या मुस्लीम व्यक्तीने लावला होता. वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here