आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या प्रसिध्द ऐतिहासिक वस्तूंचे रहस्य 90 % लोकांना माहिती नाहीये!

 

जगभरात कला आणि वास्तुकलेची अनेक कामे प्रसिध्द आहेत, त्यापैकी काहीच सखोल अभ्यास केल्यास   आपनास असे आढळून येईल कि, त्यापैकी बऱ्याच गोष्ठी ह्या रहस्यमयी आहेत. आज आम्ही आपणास अशाच काही ऐतिहासिक, रहस्यमयी वास्तू आणि वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याबाद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. वाचा सवस्तर…..

 

new google

 वस्तूं

 

1 ) आयफेल टॉवरच्या वरच्या मजल्यावरील अपार्टमेंट.

फ्रान्समध्ये असलेल्या या स्मारकाची रचना Gustave Eiffel यांनी केली होती. त्यांनी स्वतासाठी या टॉवरच्या वरच्या मजल्यावर एक अपार्टमेंट बनवले होते. याचा वापर ते अनेकदा विश्रांतीसाठी आणि पाहुण्यांना बसण्यासाठी करत असे. याच ठिकाणी Gustave Eiffel यांनी महान शास्त्रज्ञ Thomas Edison यांच्याशी खूप वेळ चर्चा केली होती.

 

या अपार्टमेंटमध्ये एक स्वयंपाकघर, स्नानगृह, दोन शयनकक्ष आणि लिव्हिंग रूम आहे. आज हे अपार्टमेंटमध्ये एक संग्रहालय बनवण्यात आले आहे. या संग्रहालयात  Gustave Eiffel आणि Thomas Edison यांचे मेणाचे पुतळे बनवले आहेत.

 

2) स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पायाजवळ असलेली तुटलेली साखळी.

 

 वस्तूं

 

फ्रान्समधील लोकांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा जगप्रसिध्द पुतळा अमेरिकन क्रांतीच्या १०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अमेरिकेला भेट स्वरुपात दिला होता. हा पुतळा स्वातंत्र्य, लोकशाही आणि गुलामगिरी बंदी यांचे प्रतिक आहे, आणि याच कारणामुळे पुतळ्याच्या पायाजवळ एक तुटलेली साखळी आहे. ह्या साखळीकडे याठिकाणी भेट देणाऱ्या किंचितच लोकांचे लक्ष जाते.

 

3) गोल्डन गेट ब्रिजचा रंग.

गोल्डन गेट ब्रिज हा जगातील सर्वात जास्तवेळा फोटोग्राफिसाठी वापरलेले ठिकाण आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सहमत होण्यासाठी अमेरिकेच्या नौदलाने बराच कालावधी लावला होता. शेवटी जेंव्हा या पुलाच्या बांधकामाची परवानगी मिळाली तेंव्हा नौदलाला अशी इच्छा होती की या पुलास काळ्या आणि पिवळ्या पट्ट्यांमध्ये रंगवावे जेणेकरून तो धुक्यात दिसून येईल. शेवटी या पुलाचे आर्किटेक्ट इर्विंग मोरो यांनी गडद नारंगी रंग देण्याचे सांगितले, हा रंग कोणत्याही परिस्थितीत दिसतो आणि या पुलाला आकर्षक सुद्धा बनवतो.

 

4) Pisa च्या झुकलेल्या टॉवरची निर्मिती.

या प्रसिद्ध टॉवरमध्ये अनेक रहस्ये लपलेली आहेत. प्रत्येकाला हि वास्तू झुकलेली अह्हे एव्हढेच माहित आहे परंतु या इमारतीचे बांधकाम कोणी केले याबद्दल कोणालाही कल्पना नाही. या रहस्याचे मुख्य कारण म्हणजे याचे बांधकाम जवळपास २०० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे.

 

 वस्तूं

 

अनेक इतिहासकारांचे असे मानाने आहे कि, बांधकाम व्यावसायिक बोनानो पिझानो यांनी या वास्तूचा पाया भरला होता. परंतु काही जणांच्या मते या इमारतीला दिओतिसालवी यांनी विकसित केले होते, ज्यांनी त्याच टॉवरशेजारी असलेल्या (baptistery) बाप्तिस्म्याची रचना केली होती.

 

5)The Great Sphinx of Giza चे मूळ स्वरूप.

 

The Great Sphinx of Giza हा जगातील सर्वात जुना पुतळा आहे. ह्या पुतळ्याला मुळात चमकदार पेंटने रंगावले होते, ज्याचा फक्त एक भाग किवळ या पुतळ्याच्या कानामागील ठिकाणी आहे याशिवाय या मूर्तीला नाक आणि दाढीही होती. यातील काही अवशेष ब्रिटीश व इजिप्शियन संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

 

काही इतिहासकारांच्या मते, या मूर्ती किंवा पुतळ्याला मुळात कुत्रा किंवा वाघाचे मुंडके बसवलेले असू शकते आणि मानवी चेहरा फक्त नंतर त्यावर कोरला गेला आहे. विशाकाय शरीर आणि लहानशे डोके हा फरक यावरून कळू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here