आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरी तुळस का असावी? काय आहे हिंदू धर्मातील तुळशीचे महत्व? वाचा हा महत्वाचा लेख..

हिंदू धर्मामध्ये तुळशीचे स्थान उच्च आहे. तुळशीची पूजा मनापासून केली जाते. ज्या घरासमोर तुळस आहे व ती तुळस हिरवीगार आहे .त्यांच्या घरी धन ,धान्य कधीही कमी पडत नाही ,असे मानले जाते. आणि त्यांच्या घरात सगळ्या सकारात्मक गोष्टी होत असतात.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरी तुळस असतेच .तुळशीची पूजा मनोभावाने केली जाते. कारण तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सुख ,समृद्धी ,पैसा येतो .तसेच तुळस ही श्रीमंत बनवते. घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने ,आदराने राहतात. मुलांचे चांगले शिक्षण पण होते .तसेच नोकरी मध्ये सुद्धा चांगले यश मिळते, आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून रक्षण होते .

तुळस

ज्या घरामध्ये दररोज आंघोळ केल्यानंतर तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा असते .

तर आपण बघणार आहोत की तुळशीजवळ काय ठेवल्याने भाग्य उजळते ,समृद्धी वाढते .आपल्याला जे हवं ते मिळते. तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या तुळशीजवळ ठेवल्याने नशीब चमकते.

१) केळीचे रोप

भगवान विष्णूची पूजा करताना केळीचे रोप असते ,कारण केळीचे रोप हे प्रतीक मानले जाते .प्रत्येक कामाचे यश मिळवायचे असेल तर तुळशीजवळ केळीचे रोप लावावे.
यामुळे गुरु ग्रह मजबूत होतो.

तसेच घरामध्ये जर लग्न जमवण्यासाठी अडचणी येत असतील, तर ते योग सुद्धा जमतात .कामामध्ये यश भेटते. शिक्षणामध्ये यश भेटते.

तुळस ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. आणि केळीचे रोप हे विष्णूचे प्रतिक आहे .त्यामुळे लाभ दुप्पट होतो तर केळीचे रोप आवश्य लावा.

२)लाल रंग

लाल रंग हा माता लक्ष्मी चा प्रिय रंग आहे .जर आपली कामे पूर्ण होत नसतील, अडथळे येत असतील, कामात यश मिळत नसेल ,इच्छा पूर्ण होत नसतील, तर कोणत्याही एका शुक्रवारी सकाळी तुळशीची पूजा झाली की लाल रंगाचा धागा तुळशीच्या एका फांदीला बांधावा. हा धागा बांधताना एक मंत्र उच्चारावा .”आवा ओम नमो भगवती भगवतेव वासुदेवाय”.

आपण जसे हातामध्ये धागे बांधतो तश्या प्रकारचा असेल आणि लाल रंग असेल तरीही ही बांधावा .याने आपली राहिलेली कामे आणि इच्छा पूर्ण होतात.

आपली कामे , इच्छा पूर्ण झाल्या . कोणत्याच कामातील सगळे अडथळे दूर झाले, की हा धागा वाहत्या पाण्यात सोडून द्यावा .म्हणजेच विसर्जन करावा.

इच्छापूर्ती करण्याचा याहून दुसरा मार्ग कोणताही चांगला नाही .

तुळस

३) दूर्वा

घरांमध्ये खूप कष्ट केल्याने सुद्धा त्याचे फळ मिळत नसेल तसेच सारखे आजारी पडत असतील, तर तुळशी जवळ दुर्वा ठेवावी यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. सगळे दुर दोष दूर होतात.

४)  स्वस्तिक

बऱ्याच घरांमध्ये तुळसच वाढत नाही .जळून जाते .यामागील कारण वाईट नजर ही असू शकते .जर तुमच्या घरावर वाईट व्यक्तीची नजर असेल ,तर तुमच्या कोणत्याच कामात यश येत नाही. भांडण होतात .तसेच घरावर मोठे संकट येणार असेल तर आपल्या अंगणातील तुळस वाढत नाही ,सुकून जाते .

अशावेळी सुकलेली तुळस आहे किंवा जळून गेलेली तुळस आहे. ती तुळस काढून नवीन रोप लावावे. आणि स्वस्तिक चिन्ह काढावे .स्वस्तिक हे मंगलतेचे ,शुभतेचे आपल्याकडे प्रतीक मानले जाते.
सर्व नजर दोषांपासून स्वस्तिक हे रक्षण करते .

५) लवंग

घरामध्ये सतत भांडणे होत असतील .सतत आजारी पडत असतील. हा फक्त वास्तुदोष आहे तुमच्या नोकरीत भरभराट होत नसेल पैसे मिळत नसतील तर एकच उपाय करा.

दोन लवंग घेऊन संध्याकाळी आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवाव्या. त्या दोन लवंग हातात धरून एक मंत्र म्हणावा.
“ओम श्री तुलसै विद्म्हे विष्णूप्रियाये धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात”.

तुळस

हा मंत्र अकरा वेळा म्हणावा

त्यानंतर त्या दोन लवंग तुळशीच्या खाली असणाऱ्या मातीत पुराव्यात आणि त्या सात दिवसानंतर काढून वाहत्या पाण्यात सोडून द्यायवेत . लवंग काढताना हाताने स्पर्श होऊ द्यायचा नाही एखाद्या कागदाने किंवा कापडांनी काढून घ्यावेत. जर पाणी नसेल तर दक्षिण दिशेला मोकळ्या मैदानात एक छोटासा खड्डा करुन त्यामध्ये त्यात दोन लवंग पुराव्यात. यामुळे जो काही वास्तुदोष आहे तो पूर्ण कमी होऊन तुम्हाला सुख शांती लाभेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

जेवण केल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर व्हा सावधान , तुम्हालाही होऊ शकतात ह्या 4 मोठ्या समस्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here