आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर सहा महिन्यांनी यातील २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. गेल्या महिन्यातच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता पडला आहे.

 

आता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे कि, या योजनेंतर्गत जवळपास २१ लाख बोगस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. कृषी मंत्रालयाने एका माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हि माहिती दिली आहे.

 

किसान

 

PM KISAAN योजना हि केंद्र शासनातर्फे २०१९ साली पासून सुरु करण्यात आली होती. या योजनेमध्ये 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना ६००० रुपये  हे दर चार महिन्याच्या २००० रुपये या हप्त्याप्रमाणे दिले जातात.

 

यापैकी किती पैसा हा बोगस खाताधाराकांच्या नावावर जमा झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यंकटेश नायक यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज केंद्रीय कृषी मंत्रालयाला पाठवला होता.

 

व्यंकटेश यांच्या अर्जाला उत्तर देताना कृषी मंत्रालयाने अशी माहिती दिली कि, जवळपास ४५ टक्के शेतकरी हे या योजनेच्या लाभासाठी बनवण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये पत्र ठरत नाहीत, यानुसार आता अशा बोगस खातेधाराकाकडून कृषी मंत्रालयाने हि रक्कम परत वसूल करणे सुरु केले आहे.

 

किसान

 

२०१९ पासून आजपर्यंत अशा बोगस खात्यावरसुमारे १३६४ कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.

 

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पंजाब याराज्यात सावाधिक बोगस शेतकरी आहेत आणि त्यापाठोपाठ आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. पंजाबमधील बोगस लाभार्त्यांची संख्या हि २३.६ टक्के म्हणजे जवळपास 4.७५ लाख एवढी आहे.

 

आसाम मध्ये ३.४५ लाख बोगस खाताधारक आहेत तर महाराष्ट्रात 2.८६ लाख बोगस लाभार्थी आहेत. या तीन राज्यातच हि संख्या ५५ टक्क्यांजवळ आहे. आता स्क्र्काराने निर्णय घेताला आहे कि ह्या बोगस लाभार्थ्यांकडून हि रक्कम परत वसूल केली जाणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

जेवण केल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर व्हा सावधान , तुम्हालाही होऊ शकतात ह्या 4 मोठ्या समस्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here