आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 

त्वचा सुंदर बनवण्यासाठी हे 7 घटक प्राचीन काळापासून वापरले जात आहेत.!

 

आजचे जीवन असो किंवा अतिप्राचीन काळ, महिला आणि साज शृंगार यांचे फार जुने नाते राहिले आहे. आजच्या वेळी अनेक महिला सजण्यासाठी ब्युटी पार्लरचा सहारा घेतात. परंतु प्राचीन काळी जेंव्हा आजच्यासारखे ब्युटी पार्लर नव्हते तेंव्हाच्या महिला ह्या आपले सौंदर्य वाढवण्यासाठी कशाचा उपायोग करत असतील असा प्रश्न आपणास अनेक वेळा पडला असेल. प्राचीन काळाच्या महिला ह्या खूप सुंदर होत्या, त्या आपले सौंदर्य निखाराण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर करत त्याच वस्तूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…….

new google

 

०१ ) दुध

त्वचा

 

आपण अनेकवेळा एकले असेल कि, प्राचीन काळाच्या राण्या आणि राजकुमारी ह्या आपली त्वचा नरम आणि चमकदार बनवण्यासाठी दुधाने अंघोळ करत. कच्च्या दुधामध्ये हळद मिसळून लावल्याने त्वचेला उजळपणा येतो. चेहऱ्यावर कच्च्या दुधाने मालिश केल्याने त्वचेचे बंद छिद्र खुलतात. तसेच कच्च्या दुधात लिंबू मिसळून लावल्याने त्वचेवरील सर्व घाण साफ होते.

 

०२ ) केसर

त्वचा

 

लाल रंगाचे हे धाग्यासारखे केसर काश्मीरमध्ये जास्त उत्पादन केली जाते. जेवणामध्ये मसाला म्हणून वापरण्या व्यातीरिक्त याचा वापर हा एक सौंदर्य प्रसाधन म्हणूनही केला जातो. केसर हे दुधात मिसळून पिल्याने त्वचेचा रंग निखरतो. दुध आणि चंदनासोबत मिसळून केसर लावल्याने टॅनिंगची समस्या दूर होते. पपई सोबत दुध, केसर आणि मध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. यासोबतच केसरमध्ये लिंबू, मध आणि बदाम मिसळून लावल्याने त्वचेत कसाव येतो आणि सुरकुत्या कमी होतात.

 

०३ ) हळद

त्वचा

 

सर्वसाधारण भारतीयाच्या स्वयंपाक घरात मिळणारी हळद हि अनेक सौंदर्य वर्धक गुणांनी भरपूर आहे. हळद हि जीवनुरोधी असते, हळदीच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डाग, फोड आणि ब्लैक हैडस हे दूर होतात. चेहऱ्यावर हळद हि चंदन, दुध, साय आणि मध मिसळून लावल्याने त्वचेचा रंग निखारतो.

 

०४ ) मोहरी

भारतीय स्वयंपाकघरात नेहमी अणाऱ्या मोहरीचे पिवळे दाणे हे केवळ खाद्य तेलासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरले जातात. मोहरीच्या दाण्यांना रात्रभर भिजत ठेऊन बारीक वाटून उटण्यासारखे लावले जाते. यामुळे शरीरावरील अनावशक केसांपासून मुक्ती मिळते.

 

त्वचा

 

०५ ) चंदन

आपल्याकडे जीनस सैटलम वृक्षापासून मिळणाऱ्या गुलाबी रंगाच्या सुगंधित लाकडास चंदन म्हणून ओळखले जाते. चंदनाचा नियमित वापर केल्याने त्वचेला थंडावा मिळतो. त्यासोबतच त्वचा चमकदार बनते आणि चेहऱ्यावरील मुरूम हे दूर होतात.

 

०६ ) कडुनिंब

 

कडुनिंब हे औषधी गुणधर्म असलेले झाड आहे, त्याची पाने किंवा साल बारीक करून चेहर्‍यावर लावल्याने चेहऱ्यावर कधीच मुरुम येत नाहीत. कडूनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने केस धुल्याने केसात असलेल्या उवा आणि कोंडा नाहीसा होतो. आयुर्वेदात कडुनिंब हे अत्यंत गुणकारी औषध मानले जाते.

 

०७ ) मुलतानी माती

गुळगुळीत आणि मऊ पिवळ्या रंगाची मुलतानी माती लावल्यास त्वचेची अशुद्धता दूर होते आणि त्वचेत कसाव येऊन ती मऊ होते. मुलतानी माती ही चंदन, हळद, केशर आणि लिंबाचा रस इत्यादीसह चेहऱ्यावर लावली जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल – मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी या आफ्रीकन सरदाराने दिली होती…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here