आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

गुन्हेगारास अशा प्रकारच्या विचित्र शिक्षा होऊ शकतात याचा विचार आजपर्यंत कोनीही केला नसेल!


 

कोणताही गुन्हा केल्यानंतर गुन्हेगारास शिक्षा अवश्य मिळते, मग त्याने केलेला गुन्हा हा लहान असो किंवा मोठा. आपल्याकडे देण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच शिक्षा आपल्या परिचयाच्या आहेत. परंतु विचार करा कि एखाद्या गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्याबद्दल विचित्र शिक्षा मिळाली तर काय होईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र शिक्षांबद्दल सांगनार आहोत, ज्यांना जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

 

new google

विचित्र शिक्षा

 

विचित्र शिक्षा ०१

अमेरिकीतील मिसुरी या ठिकाणी राहणाऱ्या डेव्हिड बेरी नावाच्या व्यक्तीने शेकडो हरिणांची शिकार केली होती. २०१८ मध्ये त्याला या गुन्ह्यासाठी दोषी ठरवत कोर्टाने वर्षभर तुरुंगात राहून, महीन्यातून एकदा डिस्नेच बाम्बी कार्टून पाहण्याची वीचित्र शिक्षा दिली होती.

 

विचित्र शिक्षा ०२

हि घटना पण अमेरीकेतच घडलेली आहे, २००३ साली अमेरिकेच्या शिकागो येथे राहणाऱ्या दोन मुलांनी चर्चमधून ख्रिस्ताची मूर्ती चोरली आणि ख्रिसमसच्या सायंकाळी त्या मूर्तीला नुकसान केले. या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर दोघांनाही ४५ दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय त्यांना त्यांच्या गावी नेऊन एका गाढवावर त्यांची धिंड काढण्यात आली होती.

विचित्र शिक्षा

विचित्र शिक्षा ०३

२०११ साली अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथे राहणाऱ्या १७ वर्षीय टायलर ऑलरेड याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा एक मित्र ठार झाला. त्यावेळी टायलर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याने त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याव्यतिरिक्त कोर्टाने त्याला दहा वर्षे चर्चमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली. यादरम्यान त्याची दररोज ड्रग, आणि निकोटीन चाचणी करण्यात यायची.

 

विचित्र शिक्षा

 

विचित्र शिक्षा ०४

स्पेनमधील अंदलुशिया येथे राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाला त्याच्या पालकांनी पॉकेटमनी देणे बंद केले, यानंतर त्याने कोर्टामध्ये आपल्याच पालाकांविरोधात खटला टाकला. परंतु हि चूक त्याला चांगलीच बोहाली होती कारण, कोर्टाने यावर निर्णय करताना आदेश दिला कि, त्याने ३० दिवसांच्या आत त्याच्या पालकांचे घर सोडून स्वताच्या पायावर उभे राहावे.
या निर्णयाची चर्चा वर्षभर सार्वत्र चालू होती.

 

विचित्र शिक्षा ०५

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, २००८ मध्ये अँड्र्यू वेक्टर हा आपल्या गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणे ऐकत होता त्याबद्दल त्याला १२० पौंड म्हणजे सुमारे ११ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी तो आपले आवडीचे संगीत ‘रॅप’ ऐकत होता. न्यायाधीशाने त्याला सांगितले की त्याच्या शिक्षेची रक्कम हि 30 पौंड कमी होऊ शकते परंतु त्यासाठी त्याला तास शास्त्रीय संगीत ऐकावे लागेल. या घटनेचीही सर्वत्र खूप चर्चा झाली होती.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here