आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

3200 वर्ष जुनी रहस्यमय आणि श्रापित ममी, आजपर्यंत ज्या व्यक्तीने या ममीला स्पर्श केला तो वाचला नाही!

 

जेंव्हा आपण प्राचीन इजिप्तबद्दल चर्चा करत असतो त्यावेळी आपल्या मनात विचार येतो तो प्राचिनकलीन ममी आणि पिरॅमिड यांचा. याठिकाणी अनेक प्राचीन काळातील मम्मी सापडल्या आहेत. आज आम्ही अशाच एका प्राचीन ममी बद्दल सांगणार आहोत, मान्यतेनुसार आजपर्यंत ज्याने तिला स्पर्श केला त्याचा मृत्यू झाला आहे.

 

new google

ममी

 

हि रहस्यमय ममी आहे इजिप्तच्या सर्वात कमी वयाच्या राजा असलेल्या तुतेनखामून याची, जी जवळपास ३२०० वर्षांपासून जमीनीत दबलेली होती. या ममीला ९७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९२२ साली शोधून काढण्यात आली होते. ब्रीटीश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कॉर्टर यांनी या ममीला शोधले होते.

 

अशी मान्यता आहे कि तुतेनखामूनच्या ममीच्या खाली खूप मोठा खजाना ठेवन्यात आला होता. जेव्हा त्याची कबर सापडली तेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांना त्याच्या ममीच्या खाली पायर्‍या सापडल्या ज्या एका सोन्याचांदीने भरलेल्या खोलीकडे जात होत्या.

 

याव्यतिरिक्त तुतेनखामूनच्या थडग्याच्या दाराशी इजिप्तच्या प्राचीन भाषेत एक चेतावणी देखील लिहिलेली होती, इशारा देऊन असे स्पष्टपणे लिहिले होते की जो कोणी तुतेनखामूनच्याची शांती भंग करेल त्याचा मृत्यू होईल.

 

ममी

 

असे असूनही पुरातत्वशास्त्रज्ञांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले ज्यामुळे हॉवर्ड कॉर्टरच्या टीमच्या सर्व सदस्यांचा एकामागून एक मृत्यू झाला. या सर्व लोकांनी मिळून तुतेनखामूनच्या ममीला थडग्यातून काढून संपत्ती बाहेर काढली होती.

मृत्यूचा हा खेळ याठिकाणीच थांबला नाही तर, तुतेनखामूनची कबर आणि खजिना शोधण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीने हॉवर्ड कॉर्टरला दिली त्या व्यक्तीचा काही महिन्यांत रहस्यमयि मृत्यू झाला. ही व्यक्ती लॉर्ड जॉर्ज कारनारवन होती यांनीच तुतेनखामूनच्या सांगाड्यास प्रथम स्पर्श केला होतां.

 

असे म्हणतात की तुतेनखामूनची रहस्यमय ममी ज्या लोकांनी पाहिली ते सर्वजन वेडी झाली किंवा काही कारानास्तव मरण पावली. असेच काही इजिप्शियन राजपुत्र अली कामिल यांच्या बाबतीत घडले, खरं तर ते आपल्या बायकोसोबत ही ममी बघायला आले होते. परंतू घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीला काय झाले की तिने राजकुमाराची हत्या केली. या घटनांनंतर त्या ममीला शापित मानले जात असे.

 

ममी

 

हॉवर्ड कॉर्टरच्या मागणीनुसार नंतर सरकारने हि शापित ममी परत त्याच ठिकाणी पुरली होती. काही वर्षानंतर लॉर्ड जॉर्ज कार्नार्व्हन यांची मुलगी लेडी एव्हलिनच्या सांगण्यावरून त्या ममीला पुन्हा थडग्यातून बाहेर काढून इजिप्तउन लंडन इथे आणून एका संग्रहालयात ठेवण्यात आले होते.

 

असे म्हटले जाते की लेडी एव्हलिन त्या ममीमुळे इतकी प्रभावित झाली होती की, ती ममीला पाहण्यासाठी दररोज संग्रहालयात जात असे. एके दिवशी मामीला पाहून ती बाहेर आली तेव्हा तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचाही मृत्यू झाला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here