आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

देवाला फोडलेला नारळ खराब निघाल्यास शुभ समजायचे का अशुभ?

 

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेसाठी नारळाचा उपयोग केला जातो. तसेच एखादे शुभ कार्य असेल तरी त्यामध्ये नारळाचा समावेश असतो. हिंदू धर्मामध्ये नारळाशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण असते.

 

new google

नारळाला श्रीफळ असेही म्हणतात तसेच नारळाला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते. पूजेमध्ये प्रत्येक नारळ अत्यंत महत्वाचा आहे. तसेच कोणत्याही देव धर्माला गेल्यानंतर पहिल्यांदा नारळ फोडावा लागतो, नवरात्रीमध्ये प्रसाद म्हणून नारळ दिले जातो.

 

नारळ

 

तसेच गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर, लक्ष्मीच्या मंदिरात, गेल्यानंतर कोणतेही कुळस्वामी च्या मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडावा लागतो. नारळ जर खराब निघाला तर आपल्याला वाईट वाटते आणि काही ठिकाणी शुभ ही मानले जाते तर नक्की काय आहे बघुया.

 

बऱ्याच वेळा देवदर्शनाला गेले की नारळ फोडला की तो खराब निघतो, आणि आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. काही वाईट होणार आहे का? का काही अशुभ होतंय? याउलट जर नारळ खराब निघाला तर तो शुभ असतो.

 

पूजेचे नारळ खराब निघणे म्हणजे शुभ असते. म्हणजेच गावाकडे ही म्हणले जाते की देव पावला. म्हणजेच देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो.

बऱ्याच वेळा जेव्हा नारळ खराब निघतो. तेव्हा आपल्याला दुकानदाराचा सुद्धा राग येतो. दुसऱ्या वेळी जेव्हा घेणार असतो तेव्हा, आपण त्याला बोलून दाखवतो की, घेतलेला नारळ खराब निघाला. त्यावर दुकानदार सुद्धा हसून बोलतो की तुम्हाला देव पावला.

 

इथून पुढे जेव्हा पण नारळ खराब निघेल. तेव्हा दुःखी न होता, आनंद व्हा. कारण जो खराब नारळ निघालेला असतो तो देव खात असतो. त्यामुळे तो खराब निघतो आणि दुसरं कोणीही खाऊ शकत नाही.

 

नारळ

 

म्हणजे जो नारळ खराब निघाला आहे तो पूर्ण नारळ भगवंताला अर्पण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी पण कोणती इच्छा आहे, ती लवकरच पूर्ण होणार आहे.तसेच तुम्ही ची पूजा करताना इच्छा व्यक्त केली आहे ती इच्छा लगेचच पूर्ण होते.

यापुढे जर नारळ खराब निघाला तर दुःखी न होता आनंदी व्हा. कारण भगवंत प्रसन्न झालेले आहेत आणि तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे.

तसेच जर नारळ चांगला निघाला तर काय करावे?

 

आपण फोडलेला नारळ जर चांगला निघाला, तर तो सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटावा. विशेष म्हणजे मंदिरांमध्ये जाऊन सगळ्यांना तो प्रसाद द्यावा. असे केल्यामुळे पूजा करताना जे पण मागितले आहे त्याचे फळ लवकर भेटते.

काही लोक प्रसाद न वाटता जो पण नारळ फोडलेला आहे तो घरी घेऊन जातात. असे केल्याने आपल्याला जो पाहिजे तो आशीर्वाद मिळत नाही आणि आपली मनोकामना ही पूर्ण होत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here