आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या मुस्लीम देशात ९०० कोटी रुपये खर्च करून भव्य हिंदू मंदिर बनवण्यात येत आहे.!


हिंदू मुस्लीम यांच्यात झालेल्या वाद विवादाबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, परंतु त्याव्यतिरिक्त अशा अनेक घटना घडतात जय हिंदू मुस्लीम एकतेचे जिवंत उदाहरण साबित होतात. अशाच एका घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. असाच एक मुस्लीम देश आहे जेथे ९०० कोटी रुपये खर्च करून भव्य मंदिराचे निर्माण होणार आहे.

 

हिंदू मंदिरहिंदू मंदिर

युनायटेड अरब इमिरात UAE ची राजधानी असलेल्या अबू धाबी शहरात एक हिंदू मंदिर बांधण्यात येत आहे ज्याची चर्चा सध्या जगभरात चालू आहे. याचे कारण म्हणजे हा देश मुस्लीम देश म्हणून प्रसिध्द आहे आणि येथील भाषा हि अरबी आहे.

या भव्य हिंदू मंदिरासाठी ९०० कोटी रुपये खर्चणार आहेत.

हे मंदिर युनायटेड अरब इमिरातमधील पहिले हिंदू मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हे जवळपास १७ एकर जागेत होणार आहे, आणि यासाठी ४५ कोटी दिराम ( जवळपास ९०० कोटी रुपाये ) खर्च होणार आहेत. २०२३ पर्यंत या मंदिराचे कामकाज पूर्ण होईल असा अनुमान आहे. एका मुस्लीम देशात एव्हढे भावी दिव्य हिंदू मंदिर बनवले जात आहे हि खूप मोठी गोष्ठ आहे.

या मंदिरात भगवान कृष्ण, महादेव आणि आयप्पा स्वामी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत.

 

हिंदू मंदिर

 

स्थानिक माहितीनुसार, मंदिराचा बाहेरील परिसर हा गुलाबी दगडांनी सजवण्यात येणार आहे. यामध्ये ५००० तन इटालियन मार्बलचा वापर करण्यात येणार आहे. हा दगड ५० डिग्री तपामानावारही झुप दिवस टिकतो म्हणून याची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या मंदिराचे डिझाईन बनवण्यात आले आहे. आणि या मंदिरात भगवान कृष्ण, महादेव आणि आयप्पा स्वामी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत.

२०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी या मंदिराचे दरवाजे उघडतील.

अल वाकबा या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या या मंदिराची अबू धाबीपासूनचे अंतर हे ३० मिनिट दूर आहे. या मंदिराची रूपरेषा अबू धाबिच्या बिजनेसमन बीआर शेट्टी यांनी तयार केली आहे. या मंदिराचे काम हे २०१७ पार्यांतच पूर्ण होणार होते, परंतु काही कारणास्तव उशीर झाला होता. परंतु आता २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here