आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या मकरसंक्रांतीला आपल्या राशीनुसार ह्या वस्तू दान कराल तर विशेष फायदा होईल.!

१४ जानेवारीला संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीचा सन साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा अर्चना केली जाते कारण सूर्य देवाची उपासना केल्याने सर्व ग्रहमान दूर होवून घरात सुखशांती लाभते. सूर्याची पूजा केल्याने शिक्षणिक क्षेत्रात आणि व्यापाऱ्यांना फायदा होतो.

 

दान

 

या दिवशी दानाचे महत्व झुप जास्त असते, आणि राशीनुसार दान केल्याने तर दानाचे महत्व अधिकच वाढते. आपल्या राशीनुसार जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे दान या संक्रातीला शुभ आहे याबद्दल….

 

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी मकरसंक्रांतीला स्नान करून शुभ काळात गरजूं व्यक्तींना रेशमी कपडे, डाळ, तिल, मिठाई खिचडी, गोड भात ह्या वस्तू दान कराव्या. जेणेकरून आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल.

 

वृषभ

मकरसंक्रातीला वृषभ राशीच्या व्यक्तींनी उडदाच्या डाळीची खिचडी, काळे कपडे, काळे तीळ, काळे उडीद यांचे दान करावे. यामुळे आपली आरोग्य दीर्घकाळासाठी चांगले राहील. यासोबतच जर आपला जमिनीशी संबंधित चालू असलेला खटलाही निकाली लागेल.

 

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रातीला खिचाद्दी, ब्र्सान लड्डू, काळी तीळ, उदाद डाळ आणि छत्रीचे दान करावे, यामुळे आपल्या व्यापारात वृद्धी होईल. सोबतच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळू शकते.

 

कर्क

या राशीच्या व्यक्तींनी मकरसंक्रातीला गरजू व्यक्तींना चना दाळ, हळकुंड, पिवळा कपडा, केसर, पितळेचे भांडे, फळ आणि खिचडी यांचे दान करावे. असे केल्यास नोकरीसाठी येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील.

 

दान

 

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनी मकरसंक्रातीच्या सकाळी लवकर स्नान करून, लाल रंगाचे कपडे, मसुराची डाळ, खिचडी, रेवड्या, गुळाची चिक्की आणि गोडतेल यांचे दान केले पाहिजे. यामुळे आपल्या परिवारात असलेला वाद दूर होतो.हे दान सकाळी लवकरच करावे म्हणजे जास्त फलदायी होते.

 

कन्या.

या राशीच्या व्यक्तींनी मकरसंक्रातीला हिरव्या रंगाचे कापडे, हिरवे मुग, पालेभाज्या इत्यादी वस्तूंचे दान करावे, जर हे दान एखाद्या किन्नरला केले तर जास्त फायदा होईल. यामुळे आपले आर्थिक निकासन होणार नाही.

 

तुळ

या राशीच्या व्यक्तींनी गरजू व्याक्तींना मकर संक्रातीला पांढरी मिठाई, गुलाबी कपडे, खडी साखर, फळ इत्यादीचे दान करावे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात मधुरता येईल.

 

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रातीच्या शुभदिनी गरजू व्यक्तींना चादर, कापडे, खिचडी, फळ आणि तीळ गुळाचे दान करावे. यामुळे जीवनात सुख शांती लाभेल आणि व्यापाराठी फायदा होईल.

 

दान

 

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनी गरजू व्यक्तींना कापडे, खिचडी, फळ, तीळ गुळ, लाल कपडे, लाल चंदन, तांब्याचे भांडे यांचे दान करावे. यामुळे आपले आरोग्य चान्गाल्र रहाते आणि व्यापाराठी फायदा होतो.

 

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी खिचडी, चादर, गुळ हिरवे वस्त्रांचे दान केल्यास अनेक फायदे होतील. हे दान सकाळी लवकर केल्यास जीवनात येणारे अनेक संकट दूर होतील.

 

कुंभ

या राशीच्या व्यक्तींनी पांढरे वस्त्र, गरम कपडे, खिचडी आणि तेलाचे दान करावे जेणेकरून आपले आरोग्य ठीक राहील आणि घरात आनंदित वातावरण राहील.

 

मीन

मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला तीळ गूळ आणि शेंगदाणे दान करावे. यामुळे आयुष्यातील तणाव कमी होईल आणि आर्थिक फायदा होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here