आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या दारू बद्दलच्या काही गोष्टी…..


काही दिवसापूर्वीच मध्य प्रदेशातील बागचीनी येथील विसंगापुरा परिसरात रासायनिक बनावट दारू पिल्याने २0 लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. येथील ग्रामपंचायतीने दारू बंदीचा निर्णय घेतला होता, त्यामुळे काही लोक अशी नकली दारू बणवून विकत होते.

आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशाशीत प्रदेश आहेत. त्यापैकी बिहार, गुजरात, मिझोरम, मानिपूर आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये दारू बंदी लागू केलेली आहे. बाकीच्या सर्व राज्यांमध्ये दरवर्षी जवळपास ६०० लिटर दारू फस्त करण्यात येते.

 

new google

दारू

 

देशातील एक तृतीयांश पुरुष हे दारू पितात. ज्याठिकाणी दारूबंदी आहे त्याठिकाणी अशी बनावट दारू विक्री केली जाते. दारूसंबंधित काही महत्वाच्या गोष्ठी अपान जाणून घेऊया…..

नकली म्हनजेच बनावट दारू हि केमिकल स्पिरीट आणि अन्य काही पदार्थ मिळून बनवली जाते. या नकली दारूची किंमत हि बाजारातील अन्य दारूपेक्षा खूप कमी असते. गावठी देशी दारूमध्ये मिथाइल अल्कोहलची मात्र जास्त असते, आणि यामुलीच या दारूचे प्राशन केल्यामुळे शरीरातील ऑप्टिक नर्व खराब होते. ह्रदय आणि लिवर सुद्धा निकामी  होऊ लागतात.

दारूचे व्यसन हे जरी वाईट असले तरीही यामुळे सरकारची तिजोरी चांगलीच भरते. केंद्र सरकारने स्टेट एक्साइज ड्यूटीने २०१९-२०२० या काळात १७५५०१.४२ कोटी रुपये कमाई केली होती.

रिजर्व बँक च्या एका अहावालानुसार राज्यातील पूर्ण कमाईपैकी १० ते १५ टक्के रक्कम हि दारूवर लागू केलेल्या करांमुळेच मिळते. इंटरनेशनल स्पिरिट्स एंड वाइंस असोसिएशन ऑफ इंडिया च्या अहवालानुसार २०१९ मध्ये 2.४८ लाख कोटी रुपयाची कमाई हि केवाळ दारूच्या विक्रीतून झाली होती. (यामध्ये नकली दारूच्या विक्रीचा समावेश नाह) आता जाणून घेऊया जगातील काही महागड्या दारूबद्दल….

 

दारू

जगातील सर्वात महाग दारूचा मान हा टकीला ले 925(Tequila LE.925) या दारूला मिळालेला आहे. या दारुची बॉटलही खास असते जीच्यावर ६४०० हिरे जडवलेली असतात. हि दारू मेक्सिको मध्ये लॉंच करण्यात आली होती,परंतु आजपर्यंत हिची विक्री झाली नाही.

 

 

दारू

(Diva Vodka) हि पण एक महागडी दारू आहे. या दारूची एक बॉटल 7 कोटी ३० लाख रुपये किमतीची असते. या बॉटलची एक विशेषता आहे, या दारूच्या सर्व बॉटल भिन्न असतात.

 

 

दारू

(Amanda de Brignac Midas) जगातील सर्वात महागडी शैंपेन आहे. जिची किंमत 1 कोटी ४० लाख रुपये प्रती बॉटल आहे.

 

 

दारू

(Dalmore 62) ही पण जगातील महागड्या दारुंपैकी एक आहे, या दारूच्या केवळ १२ बॉटल बनवण्यात आल्या होत्या. या विस्कीच्या एका बॉटलची किंमत 1 कोटी ५० लाख रुपये एव्हढी आहे.

 

 

दारू

काही लोकांना रेड वाईन खूप आवडते, त्यांच्यासाठी हि माहिती महत्वाची आहे (Penfolds Ampul)हि पेनीच्या आकाराची बॉटल असलेली रेड वाईन पिण्यासाठी तुम्हाला 1 कोटी २० लाख रुपये मोजावे लागतील.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here